Farm laws l शरद पवार, राहुल गांधींसह शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार

farm-laws-farmer-protest-joint-delegation-of-opposition-parties-will-meet-president-ramnath-kovind
farm-laws-farmer-protest-joint-delegation-of-opposition-parties-will-meet-president-ramnath-kovind

नवी दिल्ली l केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात farm laws शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासाठी शरद पवार Sharad pawar आणि राहुल गांधी Rahul gandhi यांच्या समवेत पाच पक्षांचे नेते बुधवारी संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद president ramnath kovind यांची भेट घेणार आहेत.

कोविड प्रोटोकॉल असल्याने पाच नेत्यांनाच भेटण्याची संमती राष्ट्रपतींनी दिली आहे. सीताराम येचुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपतींसोबत होणारी ही भेट कृषी कायद्यांसंदर्भात असणार आहे. गेल्या १३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत.

कृषी कायदे रद्द करण्यासाठी कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. आज शेतकऱ्यांनी भारत बंदचीही हाक दिली होती. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डाव्या विचारांचे पक्ष, शिवसेना या सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला. आता उद्या बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेऊन कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासंबंधीची चर्चा केली जाणार आहे.

हेही वाचा : शिवसेनेला शेतीतलं काय कळतं?; निलेश राणेंचा हल्लाबोल

मोदी सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावेत यासाठी मागील १३ दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे.पंजाब आणि हरयाणा या राज्यातून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन आंदोलन करत आहेत.

हेही वाचा : Moto G9 Power स्मार्टफोन झाला लाँच, पाहा खास फिचर्स आणि किंमत

या आंदोलनात ज्येष्ठ नागरिक, लहान मुलंही सहभागी झाली आहेत. शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांसोबत आत्तापर्यंत दोन वेळा चर्चा झाली आहे. चर्चेची तिसरी फेरी उद्या दुपारी पार पडणार आहे. मात्र आधीच्या चर्चांमधून काहीही तोडगा निघालेला नाही. आता नेमकं काय होणार हे कायदे मागे घेतले जाणार की शेतकरी सरकारचं ऐकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here