शेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यानं आंदोलन हिंसक;संजय राऊतांचा दावा

bombay-high-court-denied-stay-on-sanjay-raut-bail-news-update-today
bombay-high-court-denied-stay-on-sanjay-raut-bail-news-update-today

मुंबई: शेतकरी आंदोलन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली farmers Tractor Rally  दरम्यान उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलाताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत Sanjay raut यांनी मोदी सरकारवर आज गंभीर आरोप केला. “सरकारला आता यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचंय, दडपशाही करायची आहे” असं त्यांनी बोलून दाखवलं आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले, “सरकारने एकप्रकारची दडपशाही सुरू केलेली आहे. लाल किल्ल्यावर शेतकरी घुसले असं म्हणत आहेत. ते खरोखर शेतकरी होते? की कुणीतरी फूस लावून, जे आता फोटो आलेले आहेत, पंतप्रधानांबरोबर किंवा भाजपाच्या नेत्यांबरोबर जे कुणी सिद्धू वैगरे लोकं आहेत. ते कोण आहेत? कुणाचे आहेत? त्याचा तपास अगोदर करा.

हेही वाचा: भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख;गृहमंत्र्यांच्या इशा-यानंतर बदल

ते कुठं फरार झालेले आहेत? पण सरकारला आता यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचं आहे. दडपशाही करायची आहे आणि त्याचाच एक कारस्थानाचा भाग म्हणून आंदोलनात फूट पाडून त्यातील एक गट जो भाजपाच्या नेतृत्वाखाली आतमध्ये घुसला होता ते लाल किल्ल्यावर गेले.

त्यांनी गदारोळ निर्माण केला आणि आज जे सगळं चित्र निर्माण झालं आहे, परत की आंदोलनात फूट पडली. काही नेत्यांवरती गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांना पाहून घेऊची भाषा पोलिसांकडून सुरू आहे. ठीक आहे, करून घ्या. संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. पहिल्या दिवसांपासून या सरकारला सर्व प्रश्नांचा उत्तर द्यावी लागतील.”

हेही वाचा: दिल्लीमध्ये हडकंप माजवणारा दीप सिद्धू मोदी-शहांच्या गोटातला: शिवसेना

देशातील राजधानीत देशाच्या गौरवाच्या दिनी घडलेला हिंसाचाराचा शिवसेना निषेध करते. दिल्लीतील वातावरण बिघडलं याला अहंकारी सरकारच जबाबदार आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी या अगोदर टीका केलेली आहे.

हेही वाचा: Farmer’s protest : किसान आंदोलन था, है और रहेगा, 30 जनवरी को रखेंगे उपवास

“दिल्लीत जे आज झालं त्याला मी राष्ट्रीय स्तरावरील लाजिरवाणी गोष्ट मानतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज संपूर्ण जग देशाचं सामर्थ पाहत असताना दुपारनंतर संपूर्ण जगाने दिल्लीच्या रस्त्यांवर जे दृश्य पाहिलं. हे आंदोलकांना शोभा देत नाही किंवा सरकारलाही शोभत नाही.” असं राऊत म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here