AIMIM :औरंगाबादेत एमआयएमचे माजी नगरसेवक अज्जू नाईकवाडींवर जीवघेणा हल्ला!

Fatal attack on former MIM corporator Ajju Naikwadi in Aurangabad!
Fatal attack on former MIM corporator Ajju Naikwadi in Aurangabad!

औरंगाबाद: औरंगाबाद येथील एमआयएमचे (AIMIM) माजी नगरसेवक तथा माजी जिल्हाध्यक्ष अज्जू नाईकवाडी यांच्यावर जुन्या वैमनस्यातून नासेर शेख यांच्या गटाकडून लाठ्या काठ्या, तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये अज्जू नाईकवाडी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

नासेर शेख व अज्जू नाईकवाडी यांच्या मध्ये जुने वाद आहेत. राजकीय वादासोबत त्यांच्यात नंतर जमिनीवरून वाद सुरू झाले. मंगळवारी दोघांचे गट पुन्हा एकमेकांसमोर उभे राहिले. दुपारी १ वाजेच्या सुमारास मोठे सदस्य जमा होऊन एकमेकांवर भिडले. यावेळी अज्जू नाइकवाडी यांच्या डोक्यावर तलवार,लाठ्या,काठ्याने हल्ला करण्यात आला. त्यात ते रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळले.

नासेर शेख यांच्या गटातील एक जण गंभीर जखमी झाला. इतरांनी नाईकवडे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर नासेर यांच्या गटातील जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती कळताच सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. हाणामारीत असलेल्या काही संशयितांना त्यांनी ताब्यात देखील घेतले.

दरम्यान, या दोघांमध्येच तीन चार महिन्यांपूर्वी देखील तुफान हाणामारी झाली होती. त्यात जवळपास तीन ते चार जण गंभीर जखमी झाले होते. त्याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यामध्ये दोन्ही गटांच्या परस्पर तक्रारी विरोधी भादवि कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारच्या घटनेत देखील दोन्ही गटांकडून सिडको पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.

अज्जू नाईकवाडी यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाला होता. हल्ला प्रकरणामुळे एमआयएमचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. या प्रकारामुळे चिश्तिया परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here