Sameer Wankhede :समीर वानखेडेंविरोधात अखेर गुन्हा दाखल

नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावावर एक बार आहे. या बारसाठी १९९६ ते ९७ या काळात खोटी माहिती देऊन परवाना मिळविला होता.

fir-filed-against-irs-offier-sameer-wankhede-in-illegal-liquor-selling-license-case-navi-mumbi-news-update
fir-filed-against-irs-offier-sameer-wankhede-in-illegal-liquor-selling-license-case-navi-mumbi-news-update

मुंबई: एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना कमी वयात मद्यविक्रीचा परवाना मिळविल्याचे प्रकरण भोवण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांनी खोटी माहिती देऊन मद्य विक्रीचा परवाना मिळवला असल्याची तक्रार पोलिसांत (FIR Against Sameer Wankhede) देण्यात आली आहे. त्यानंतर वानखेडेंविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे वानखेडेंच्या अडचणीत वाढ होणार आहे.

नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावावर एक बार आहे. या बारसाठी १९९६ ते ९७ या काळात खोटी माहिती देऊन परवाना मिळविला होता. याबाबत उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी समीर वानखेडेंविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रूझ ड्रग्स प्रकरणानंतर समीर वानखेडे वादात सापडले होते. ते चुकीच्या कारवाया करतात, असा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोपही मलिकांनी केले होते. अवघ्या १७ व्या वर्षी वानखेडेंनी बारचा परवाना मिळविल्याचा आरोप देखील मलिकांनी केली होता.

त्यानंतर वानखेडेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी केली असता परवाना मिळविला त्यावेळी समीर वानखेडेंचं वय कमी असल्याचं समोर आलं होतं.

याप्रकरणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेण्यात आली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बारचा परवाना रद्द केला होता. आता वानखेडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here