कंगनासह तिच्या बहिणीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोर्टाने दिला होता आदेश, कंगनाच्या अडचणीत वाढ

fir-registered-against-kangana-ranaut-and-her-sister-rangoli-chandel-bandra-police-sation
fir-registered-against-kangana-ranaut-and-her-sister-rangoli-chandel-bandra-police-sation

मुंबई l अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली चांडेल विरोधात मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२४ अ सह विविध कलमांतर्गत कंगना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना अभिनेत्री कंगना रणौतसह तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.

कंगना रणौत आणि रंगोली ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप आहे. वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती.

याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे.

वाचा l आशिष शेलारांनी केलं मुख्यमंत्र्यांचे पुत्र तेजस ठाकरेंचं कौतुक

कंगना वारंवार आक्षेपार्ह ट्विट करत असून यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

याचिकाकर्त्यांना आधी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पण पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. यावेळी कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल कऱण्याचा आदेश दिला.

वाचा l ‘विवेक ओबेरॉय भाजपच्या गोटातला, पण आता काय घडले?’;शिवसेनेचा खोचक सवाल

कंगना बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून सोशल मीडियापासून ते टीव्हीपर्यंत सगळीकडे विरोधात बोलत असल्याचाही उल्लेख यावेळी कोर्टात करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here