CoronaVaccine l मुंबईत कोविड लसीचा पहिला साठा दाखल

कोव्हिशील्ड लसीचे १ लाख ३९ हजार ५०० डोस मिळाले

first-batch-of-covishield-vaccine-reaches-in-bmc-mumbai
first-batch-of-covishield-vaccine-reaches-in-bmc-mumbai

मुंबई: कोरोनावरील बहुप्रतिक्षित लसीचा पहिला साठा आज मुंबईत Mumbai पोहोचला आहे. सीरम इन्स्टिट्यूटने येथील कोव्हिशील्ड लसीचे Covishield Vaccine १ लाख ३९ हजार ५०० डोस आज पहाटे साडेपाच वाजता मुंबईत आणले गेले. हा साठा पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात सुरक्षितपणे ठेवण्यात आला आहे. 

कडेकोट पोलीस बंदोबस्तात लसीचा हा साठा मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पुण्याहून आणला. देभभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यातील साठा दाखल झाला.

पालिकेच्या कांजुरमार्ग येथील मार्केट इमारतीत लशींसाठी कोल्ड स्टोरेज काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळं लस साठवणूक करण्याची व्यवस्था पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात करण्यात आली आहे.

कांजुरमार्ग येथील कोल्डस्टोरेजची क्षमता एकाच वेळी सुमारे एक कोटी लशींच्या साठवणुकीची आहे. तर एफ दक्षिण विभाग कार्यालयातील लस क्षमता १० लाख इतकी आहे.

दोन लाख जणांना लस

मुंबईत सव्वा लाख आरोग्य कर्मचारी आणि इतर संबंधित कर्मचारी अशा २ लाख व्यक्तींची नावे कोविन अॅपवर नोंदवण्यात आली आहेत. या दोन लाख जणांना लस दिली जाईल.

Black tea benefits : बेहद फायदेमंद है ब्लैक टी, स्टडी में हुए चौंकाने वाले खुलासे

मुंबईत केईएम, नायर, सायन, कूपर, राजावाडी, व्ही. एन. देसाई, भाभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी रुग्णालयांत लसीकरण प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.

बीकेसीतील केंद्रासह पालिका रुग्णालये, आरोग्य केंद्रे, दवाखाने, आरोग्य केंद्रामध्येही लसीकरण होणार आहे. त्या जोडीला पुढील कालावधीत शाळा आणि परिसरातील सभागृहांचाही त्यासाठी उपयोग केला जाईल.

पालिकेने २७५ मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण

लसीकरण यशस्वी व्हावे यासाठी पालिकेने २७५ मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. त्या मदतीने २,५०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

लसीकरण वेगवान आणि सुरक्षित होण्यासाठी आणखी १० हजार कर्मचाऱ्यांची निवड झाली असून त्यातील ५ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणदेखील पूर्ण झाले आहे.

यह भी पढ़ें : बाबरी विध्वंस मामला: उमा, जोशी, आडवाणी समेत 32 लोगों को बरी करने के खिलाफ सुनवाई आज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here