मौलाना आझाद महाविद्यालयाच्या एमएस्सी प्रथम वर्षाच्या विद्यार्थीनींचा परिक्षा केंद्रावर छळ!

शिव छत्रपती कॉलेज सिडको येथील धक्कादायक प्रकार

First year M.Sc. students of Maulana Azad College were harassed at the examination center!
First year M.Sc. students of Maulana Azad College were harassed at the examination center!

छत्रपती संभाजीनगर: एमएसस्सी प्रथम वर्षाचे पहिल्या सत्राचे सोमवार ते शनिवार अशी परिक्षा पार पडली. शिव छत्रपती कॉलेज सिडको shiv chhatrapati college हे परिक्षा केंद्र होते. शुक्रवारी रिसर्च मेथोडोलॉजी हा पेपर सकाळी १० वाजता होता. त्याचवेळी सेंटरमधील इतर परिक्षार्थींनी आझाद महाविद्यालयाच्या मुलींच्या डेक्सकडे कॉप्या फेकल्या. ज्यांनी कॉप्या फेकल्या त्या विद्यार्थ्यांवर कोणतीच कारवाई झाली नाही. उलट मौलाना आझाद महाविद्यालयाच्या Maulana Azhad College एमएसस्सी MSc Exam करणा-या २५ विद्यार्थीनींना तुम्ही बुरखा का घातला असे सांगत अपमानीत करण्यात आले. दमदाटी करत त्यांचा अर्धा तास आधी पेपर हिसकावून घेण्यात आला, असा आरोप विद्यार्थीनींनी केला.

मौलाना आझाद महाविद्यालयातील एमएसस्सीच्या काही विद्यार्थीनींचे परिक्षा केंद्र हे शिव छत्रपती कॉलेज सिडको येथे आले होते. तेथे परिक्षा केंद्रावर त्यांना त्रास देण्याचे काम परिक्षा केंद्रावर करण्यात आले. असा आरोप परिक्षार्थी विद्यार्थीनीं केला आहे. परिक्षा केंद्रावर जर विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे काम होत असेल तर आम्ही परिक्षा कशी द्यायची असा सवाल विद्यार्थीनींनी केला आहे. त्याबाबत आम्ही लेखी तक्रार करणार आहोत असेही सांगितले. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करून असाही इशारा विद्यार्थ्यांनी दिला.

४५ मिनिटे आधी बदलला सेंटर…
एमएसस्सी कॉम्प्युटर, बायोटेकच्या विद्यार्थ्यांचा हॉल तिकीटावरील परीक्षा केंद्राऐवजी त्यांना परिक्षा सुरु होण्याच्या ४५ मिनिट आधी सेंटर बदलण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर आला. मात्र, विद्यार्थ्यांची फजिती झाली. पालकांनाही त्रास सहन करावा लागला.

आमच्याकडे तक्रार आल्यानंतर विद्यापीठाला कळवू…
एमएसस्सीच्या विद्यार्थ्यांवर परिक्षा केंद्रावर काही चुकीच घडलं असेल तर त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी. आम्ही विद्यापीठाला त्याबाबत पत्र व्यवहार करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम करू.
-डॉ. सय्यद अथरोद्दीन कादरी, असोसिएट प्रोफेसर, तथा चीफ सुप्रीटेंन्डन एक्झामिनेशन.मौलाना आझाद महाविद्यालय. छत्रपती संभाजीनगर.
—————-
शिव छत्रपती कॉलेजमध्ये पेपर सुरु असताना आमची तपासणी करण्यात आली. तसेच आम्हाला बुरखा घालून का आलात असे सांगण्यात आले. आम्हाला वॉशरुममध्ये घेऊन जाऊन चुकीच्या पध्दतीने आमची चेकींग केली. आम्हाला त्रास देण्यात आला. तसेच अर्धा तास आधी पेपर हिसकावून घेण्यात आला. याची तक्रार आम्ही आमच्या मौलाना आझाद महाविद्यालयांच्या वरिष्ठांकडे करणार आहोत.
एक परीक्षार्थी

आमच्या अंगावर काही मुलांनी कॉप्या फेकल्या परंतु त्यांना परिक्षा केंद्रावरील शिक्षकांनी काहीच केले नाही. उलट आम्हाला त्रास देण्यात आला हे अत्यंत चुकीचे आहे. परिक्षा केंद्रावर आम्हाला दमदाटी करण्यात आली. आम्हाला न्याय पाहिजे. अशा पध्दतीने आमच्या गुणवत्तेवर परिणाम होईल.
एक परीक्षार्थी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here