रंग बदलणारा सरडा आपणा सर्वांना माहितीच आहे. पण रंग बदलणारा मासा (Fish video) कधी पाहिला आहे का? (Fish changing colour video) रंगबेरंगी मासे पाहिले असतील पण रंग बदलणारा मासा नक्कीच नाही (Changing colour fish video). अगदी सरड्यासारखा रंग बदलणारा हा मासा. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
रंग बदलणारा मासा पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. मासासुद्धा सरड्याप्रमाणे रंग बदलू शकतो यावर तुम्हाला व्हिडीओ पाहून स्वतःच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. हा मासा अगदी सेकंद सेकंदाने रंग बदलतो आहे. सरड्यापेक्षाही कमी वेळेत हा मासा आपला रंग बदलताना दिसतो. अगदी मिनिटभरातच त्याचे वेगवेगळे रंग दिसतात.
खरंतर हा मासा नाही तर मासा आणि सरडा या दोघांसारखा दिसणारा एक प्राणी आहे. पण त्याला पाहताच तो सुरुवातीला मासाच आहे, असंच वाटतं. व्हिडीओत पाहू शकता एका टबमध्ये पाण्यात हे दोन प्राणी आहेत. वरून एक व्यक्ती या टबमध्ये पाणी ओतते आहे.
View this post on Instagram
पण त्यावेळी एका माशाचा मात्र रंग बदलतो…
सामान्यपणे जेव्हा कोणत्याही प्राण्याच्या अंगावर असं पाणी पडतं, म्हणजे त्यांना तो एकप्रकारे धोका वाटतो आणि मग ते तिथून पळतात. हे दोन्ही प्राणीही तसेच पळताना दिसत आहे. पण त्यावेळी एका माशाचा मात्र रंग बदलतो आहे. जेव्हा त्याच्या अंगावर पाणी पडतं तेव्हा तो आपले रंगही बदलतो.
लाल, हिरवा, पिवळा, निळा, गुलाबी, जांभळा असे किती तरी रंग या प्राण्याचे दिसतात. आता हा प्राणी खरंच असं रंग बदलतो का? व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. काही नेटिझन्सच्या मते हे एडिटिंग आहे, प्रत्यक्षात हा प्राणी रंग नाही बदलत आहे.