Nokia ने लॅपटॉपनंतर आता भारतात लाँच केला AC

29 डिसेंबरपासून होणार विक्री, किंमत फक्त 30,999 रुपये

flipkart-launches-nokia-air-conditioners-at-a-starting-price-of-rs-30999-to-be-available-flipkart
flipkart-launches-nokia-air-conditioners-at-a-starting-price-of-rs-30999-to-be-available-flipkart

Nokia ने स्मार्टफोन, टीव्ही आणि लॅपटॉपनंतर भारतात एसी AC (एअर कंडिशनर) लाँच केला आहे. नोकियाच्या एअर कंडिशनर्समध्ये इनव्हर्टर टेक्नॉलॉजी आणि मोशन सेन्सर्स यांसारखे फिचर्स आहेत. 30,999 रुपये इतकी एसीची AC ची बेसिक किंमत ठेवली आहे.

फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर नोकिया AC ची विक्री
Nokia चे 29 डिसेंबरपासून फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर नोकिया Nokia AC एसी विक्रीसाठी उपलब्ध असतील. नोकियाने या एसींसाठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टसोबत भागीदारी केली आहे.

हेही वाचा l अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणजे मिनी इंडिया;पंतप्रधान मोदींकडून कौतुक

नोकियाच्या एसींचं वैशिष्ट्य म्हणजे हे एअर कंडिशनर्स संपूर्णपणे भारतात डिझाइन करण्यात आले असून मॅन्युफॅक्चरिंगही भारतातच झाली आहे. नोकिया एसीमध्ये सेल्फ क्लिनींग टेक्नॉलॉजीसोबतच फोर-इन-वन अ‍ॅड्जस्टेबल इनव्हर्टर मोड आहे.

Rakul preet singh l अभिनेत्री रकुल प्रीत सिंह कोरोना पॉझिटीव्ह

याशिवाय एनव्हायरमेंट फ्रेंडली R-32 रेफ्रिजेरेन्ट, मोशन सेन्सर आणि वायफाय कनेक्टेड स्मार्ट क्लायमेट कंट्रोल यांसारखे शानदार फिचर्स आहेत.

फोनद्वारे एसी करता येणार कंट्रोल
तसेच, स्मार्टफोनद्वारेही एसी कंट्रोल करता येईल. नोकियाच्या एअर कंडिशनर अ‍ॅपमध्ये स्मार्ट फिल्टर क्लीन रिमाइंडर, मल्टीपल शेड्यूलर, स्मार्ट डायग्नोसिस यांसारखे फिचर्सही आहेत.

यह भी पढ़ें l CBSC l देश में जनवरी-फरवरी में नहीं होंगी CBSE बोर्ड की परीक्षाएं

टर्बो क्रॉस फ्लो फॅनसोबत फोर-वे क्रॉसिंग आणि नो-नॉइजचा पर्यायही मिळेल. एसीमध्ये ट्रिपल इनव्हर्टर टेक्नॉलॉजी आणि Hidden डिस्प्लेही आहे. भारतीय युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन या एसीची निर्मिती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here