काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांचं निधन

former-himachal-pradesh-chief-minister-virbhadra-singh-dies-at-87-news-update
former-himachal-pradesh-chief-minister-virbhadra-singh-dies-at-87-news-update

शिमला l हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरभद्र सिंग यांचं निधन Chief Minister Virbhadra Singh Dies झालं आहे. गुरुवारी शिमला येथे पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असणारे विरभद्र सिंग यांनी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनक राज यांनी दिली आहे.

विरभद्र सिंग यांना सोमवारी ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं अशी माहिती डॉक्टर जनक राज यांनी दिली आहे. नऊ वेळा आमदार आणि पाच वेळा खासदार राहिलेल्या विरभद्र सिंग यांनी सहा वेळा हिमाचल प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं.

विरभद्र सिंग यांना जून महिन्यात करोनाची लागण झाली होती. दोन महिन्यात दोन वेळा त्यांनी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. याआधी १२ एप्रिलला त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना चंदिगडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. करोनामधून बरं झाल्यानंतर ३० एप्रिल रोजी रुग्णालयातून घरी परतल्यानंतर काही तासातच त्यांना श्वसनाचा आणि ह्दयासंबंधी त्रास जाणवू लागला होता. तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल होते.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

विरभद्र सिंग यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला आहे. विरभद्र सिंग यांच्या पत्नी प्रतिभा सिंग आणि मुलगा विक्रमादित्य सिंगदेखील सक्रीय राजकारणात आहेत. प्रतिभा सिंग माजी खासदार असून विक्रमादित्य सिंग शिमला ग्रामीणमधून आमदार आहेत.

 विरभद्र सिंगांनी सहा वेळा मुख्यमंत्रीपदी केले काम…

सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेले विरभद्र सिंग १९९८ ते २००३ मध्ये विरोधी पक्षनेते होते. याशिवाय केंद्रीय मंत्रीपदीदेखील होते. तसंच १९७७, १९७९, १९८० आणि २६ ऑगस्ट २०१२ ते डिसेंबर २०१२ पर्यंत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here