Mohammad Azharuddin l मोहम्मद अझहरुद्दीन यांच्या गाडीला अपघात,बालंबाल बचावले

Former Indian captain mohammad azharuddin car-met-with-an-accident-in-soorwal-rajasthan
Former Indian captain mohammad azharuddin car-met-with-an-accident-in-soorwal-rajasthan

जयपूर : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अझहरुद्दीन Former Indian captain Mohammad Azharuddin यांच्या गाडीला अपघात Car accident झाला. अपघातात त्यांची गाडी उलटली. सुदैवाने या अपघातात मोहम्मद अझहरुद्दीन Mohammad Azharuddin यांना दुखापत झाली नाही. हा अपघात राजस्थानमधील Rajasthan लालसोट-कोटा मेगा हायवेवर सुरवाल पोलीस ठाण्याजवळ झाला आहे.

५७ वर्षीय अझहरुद्दीन हे आपल्या परिवारासह रणथंभौरच्या दिशेने निघाले होते त्याच दरम्यान वाटेत हा अपघात झाला आहे. अझहरुद्दीन यांचे खासगी सहाय्यकांच्या मते, अझहरुद्दीन हे सुखरुप आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. अपघातनंतर दुसऱ्या गाडीतून अझहरुद्दीन यांना हॉटेलपर्यंत पोहोचवण्यात आले.

अझहरुद्दीन यांची कारकिर्द 

मोहम्मद अझहरुद्दीन यांनी भारतीय टीमसाठी ९९ टेस्ट मॅचेस आणि ३३४ वन-डे मेचेस खेळल्या आहेत. त्यांनी तीनवेळा वर्डकपमध्ये टीम इंडियाचं कॅप्टनपद भूषवलं आहे. ९९ टेस्ट मॅचेसमध्ये ४५.०३च्या अॅव्हरेजने त्यांनी ६२१५ रन्स बनवले आहेत. तर ३३४ वन-डे मॅचेसमध्ये त्यांनी ३६.९२च्या अॅव्हरेजने ९३७८ रन्स केले आहेत.

हैदराबाद क्रिकेट संघाचे अध्यक्ष

अझहरुद्दीन यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. त्यांनी २००९ साली काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली. उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथून ते विजयी सुद्धा झाले. त्यानंतर त्यांनी हैदराबादमध्ये क्रिकेट संघाच्या राजकारणात प्रवेश केला. गेल्यावर्षी लोढा समितीच्या सुधारणांनंतर झालेल्या निवडणुकीत त्यांना हैदराबाद क्रिकेट संघाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

हेही वाचा : आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here