मुंबई: अकोल्याचे माजी महापौर मदन भरगड Madan Bhargad यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले Nana patole यांच्या उपस्थितीत आज त्यांचा मुलगा व कार्यकर्ते यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भरगड यांच्या पक्ष प्रवेशामुळे अकोल्यात काँग्रेस पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत होईल असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले.
गांधी भवन येथे विविध पक्षातील कार्यकर्त्यांनीही आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात नवी मुंबई, एरोली, डोंबिवली, माढा येथील कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, चारुलता टोकस, आ. वजाहत मिर्झा, मा. आ. हुस्नबानो खलिफे, सरचिटणिस व प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, अतुल लोंढे, संजय लाखे पाटील, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे, पर्यावरण सेलचे प्रदीप वर्तक आदी उपस्थित होते.
हेही वाचा: कंगनाला दणका; जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी जामीनपात्र वॉरंट जारी