माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन, सहा वर्षांपासून होते कोमात

पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केले.

former-union-minister-jaswant-singh-passed-away-today
माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन, सहा वर्षांपासून होते कोमात former-union-minister-jaswant-singh-passed-away-today

नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे आज रविवार (27 सप्टेंबर) निधन झाले. (former-union-minister-jaswant-singh-passed-away )गेल्या सहा वर्षांपासून ते कोमामध्ये होते आज अखेर त्यांची मृत्यशी झुंज संपली. मृत्यूसमयी ते ८२ वर्षांचे होते. आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी निधन झाले. २५ जून रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

जसवंत सिंह हे गेल्या सहा वर्षांपासून कोमामध्ये होते. जसवंत सिंह हे आपल्या राहत्या घरी 8 ऑगस्ट 2014 ला पाय घसरुन पडले होते. यानंतर उपचारादरम्यान कोमामध्ये गेले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. ते कधी कधी डोळे उघडायचे, पण काही बोलायचे नाही, अशी माहिती त्यांचे सुपुत्र मानवेंद्र सिंह यांनी दिली होती.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांनी १९९९ ते २००४च्या दरम्यान संरक्षण, विदेश आणि अर्थ मंत्रालयाचा कारभार सांभाळला. २०१४मध्ये भाजपनं सिंह यांना बाडमेर मंतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारलं होतं. त्यावेळी नाराज झालेल्या जसवंत सिंह यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत अपक्ष निवडणुक लढले. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली. त्याचवर्षी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळं ते सहा वर्ष कोमामध्ये होते.

जसवंत सिंह यांनी 2014 ला निवडणुकीदरम्यान तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी भाजपला रामराम केला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.

जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे – पतप्रधान नरेंद्र मोदी 

“जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत मोदींनी ट्वटिमध्ये म्हटले की, जसवंत सिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे.”

“राजकारण आणि समाजातील विविध मुद्यांवरील अद्वितीय दृष्टिकोनासाठी जसवंत सिंह यांची आठवण काढली जाईल. त्यांनी भाजपाला बळकट करण्यासाठी देखील मोठे योगदान दिले. मी सदैव आमच्यात झालेला संवाद स्मरणात ठेवेल. त्यांचा परिवार व समर्थकांच्या दुःखात मी सहभागी आहे” असं देखील पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
भाजपाला बळकट करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली – राजनाथ सिंह 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “ जसवंत सिंह हे त्यांच्या बौद्धिक क्षमतांसाठी आणि देशाच्या सेवेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांनी राजस्थानमध्ये भाजपाला बळकट करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या परिवार व समर्थकांच्या बरोबर आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here