Jaysingrao Gaikwad l माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा भाजपाला रामराम

जयसिंगराव गायकवाड म्हणाले, भाजपात सन्मानाची वागणूक मिळाली नाही मग अशा पक्षात राहून मी काय करु

former-union-minister-jayasingrao-gaikwad-resigned-bjp-membership
former-union-minister-jayasingrao-gaikwad-resigned-bjp-membership

औरंगाबाद l भाजपाचे ज्येष्ठ नेते, मंत्री माजी  जयसिंगराव गायकवाड Jaysingrao Gaikwad यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देऊन पक्षाला रामराम ठोकला. jaysingrao-gaikwad-give-resignation

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपकडून माजी खासदार जयसिंगराव गायकवाड Jaysingrao Gaikwad इच्छूक होते. मात्र पक्षातर्फे मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड Jaysingrao Gaikwad यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता जयसिंगराव गायकवाड यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेणार असले तरी त्यांनी पक्षालाच रामराम ठोकला आहे.

जयसिंगराव गायकवाड यांनी सुरुवातीपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरून ‘प्रयोग थांबवा, काकांना उमेदवारी द्या’ अशी मागणी केली जात होती.

हेही वाचा l Balasaheb Thackeray Death Anniversary|बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतीदिन, शिवतीर्थावर गर्दी न करण्याचे आवाहन

जयसिंगराव गायकवाड यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. त्यांनी दोनवेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्त्व केले आहे. गेल्या काही वर्षांपासून जयसिंगराव गायकवाड सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

हेही वाचा l Spring Onion l कांद्याच्या पातीचे गुणकारी फायदे

महाविकासआघाडीतील तीन पक्षांच्या ताकदीमुळे ही निवडणूक भाजपला अवघड जाणार आहे. यामध्ये आता जयसिंगराव गायकवाड यांनीच पक्षाला रामराम ठोकल्यामुळे  भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपाला ही निवडणूक अ़डचणीची ठरण्याची  शक्यता आहे.

भाजपात सन्मानाची वागणूक मिळाली नाही- जयसिंगराव गायकवाड

मी अनेक वर्षांपासून पक्षाकडे जबाबदारी मागत होतो. मी अनेक वेळा वरिष्ठ नेत्यांची ई-मेलव्दारे पत्रव्यवहार केले. फोन केले पण माझे फोन घेतले गेले नाही. मग अशा पक्षात राहून मी काय करु? शहरात भाजपचे नेते येऊन जातात पण मला कधी बोलावले जात नाही, सन्मानाची वागणूक दिली जात नाही. मग या पक्षात राहून मी काय करु. असंही जयसिंगराव गायकवाड म्हणाले.