Voice of Media: लोकशाही टिकविण्यासाठी चौथा स्तंभ महत्वाचा : पृथ्वीराज चव्हाण

व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशनाचा समारोप

Fourth pillar important to sustain democracy: Prithviraj Chavan
Fourth pillar important to sustain democracy: Prithviraj Chavan

बारामती (गदिमा सभागृहातून) : चौथा स्तंभ म्हणून असलेल्या मीडियाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नवीन तंत्रज्ञानाचे पत्रकारितेसमोर आव्हान आहे. जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. लिखित वर्तमानपत्राच्या अस्तित्व बाबतीत साशंकता आहे.  अशा परिस्थितीत वाईस ऑफ मीडियाची (Voice of Media) कामगिरी अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavan) यांनी येथे काढले. दोन दिवसापासून बारामती येथे सुरू असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशना चा समारोप झाला. 

समारोप सत्राचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, समाजसेवक पोपटराव पवार, राष्ट्रीय  सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ,  शिवराज पाटील, राणा सुर्यवंशी यांची यावेळी उपस्थिती होती.

पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले, व्हॉइस ऑफ मीडियाने की तीन वर्षांत मोठे राष्ट्रव्यापी संघटन उद्दीष्टाच्या बळावर वाढत आहे. पत्रकाराची विश्वासार्हता कायम राहिली पाहिजे. स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारितेबाबत साशंकता ती दूर करण्याची मोठी जबाबदारी व्हाॅईस ऑफ मीडियावर आहे.

सकारात्मकता जपा – राजश्री पाटील

गोदावरी समूहाच्या राजश्री पाटील यांनी पत्रकारांच्या देशात १३० संघटना असताना अजून एक का? हा प्रश्न मनात  निर्माण होतो. मात्र व्हाईस ऑफ मीडियाचे काम हे पत्रकारांच्या उत्कर्षाच्या पंचसूत्रीवर आधारीत असल्याने वेगळे आहे. सगळीकडे अंधकार असताना सकारात्मकता जपत चैत्यन येथून प्रत्येकाला घेऊन जायचे आहे. व्हाईस ऑफ मीडिया सदस्यांची एकजूट ही खरी ताकद दिसून ती कायम टिकावी अशा शुभेच्छा दिल्या. संदीप काळे यांनी दृष्ट काढण्यासारखं मोठं काम उभ केले आहे, आंतर राष्ट्रीय पातळीवर हे काम लवकरच नावारूपाला यावे असे सांगितले.

पत्रकारितेचा अंकुश कायम असावा – पोपटराव पवार

पोपटराव पवार यांनी संघटन कसं असावं ही भूमिका समजावून सांगितली. “खेड्याकडे चला” हा मूलमंत्र आवश्यक आहे. तेव्हा महानगर आणि त्यावरील ताण कमी करता येईल. भारत, इंडिया असा फरक उभा राहिला आहे.  प्रजासत्ताकाचे गणराज्य कसं येईल यासाठी चारही स्तंभ काम करत असतात, मात्र पत्रकारांनी आपला अंकुश ठेवणे मोठे काम असल्याचे प्रतिपादन पवार यांनी केले. महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारं राज्य आहे. स्व. आर. आर. पाटील यांनी केलेल्या कामाची आणि चळवळीला दिलेल्या पाठबळाची आठवण करून देत ग्रामविकासाठी प्रत्येकाने पुढे यायला पाहिजे असे आवाहन केले. पंचायत राज व्यवस्थेचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले.

सन्मान कर्तृत्वाचा !

यावेळी व्हाईस ऑफ मीडिया संस्थापक संदीप काळे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. हिंगोली टीम ला नियोजित घर प्रकल्पासाठी तसेच सर्वोत्कृष्ट शाखा चंद्रपूर,  उत्कृष्ठ संघटन बांधणी धाराशिव आणि वाशिम यांना विभागून सन्मानित करण्यात आले. तसेच परभणीचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, विजय चोरडिया (मराठवाडा), मंगेश खाटीक ( विदर्भ) या दोन विभागीय अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. फिरोज पिंजारी यांना राष्ट्रीय संघटन बांधणीसाठी तसेच विनोद बोरे व अर्चना बोरे  दाम्पत्य,  किरण गुजर, सचिन सातव, मिलिंद संघवई, हनुमंत पाटील, विशाल बाबर, अमर चोंडे, संजीव कल्पुरी, स्वप्नील शिंदे  यांनाही सन्मानित करण्यात आले.  प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी पत्रकारांच्या पाल्यासाठी शैक्षणिक किट वाटप शुभारंभ झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here