मुंबईत पुन्हा जी- २० परिषदेची बैठक, पालिका प्रशासन लागले कामाला

g20-summit-meeting-again-at-the-end-of-march-in-mumbai-mumbai-print-news-update
g20-summit-meeting-again-at-the-end-of-march-in-mumbai-mumbai-print-news-update

मुंबई: मुंबईत जी-२० शिखर परिषदेच्या विकास कार्यगटाची दुसरी बैठक मार्च अखेरीस होणार आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे. मुंबईमध्ये दिनांक २८ ते ३० मार्च दरम्यान जी २० परिषदेची व्यापार आणि वित्त गटाची बैठक होणार आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पार पडलेल्या जी २० परिषदेच्या पहिल्या बैठकीप्रमाणेच या बैठकीचीही बहुतांश ठिकाणे आणि अभ्यागतांची निवास व्यवस्था असणारी हॉटेल्स कायम आहेत.

 गेल्या बैठकीच्या वेळी परिषदेला उपस्थित राहणाऱ्या परदेशातील सदस्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील रस्ते अवघ्या काही दिवसात सजले होते. ज्या ठिकाणी या बैठका होणार आहेत त्या परिसरातील रस्ते रोषणाईने व रंगरंगोटीने सजले होते. यावेळीही संबंधित मार्गांवर रस्ते देखभाल आणि इतर आवश्यक कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिले. अभ्यागतांसाठी वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवेची उपलब्धता राहील, याची काळजी घ्यावी, आदी सूचना देखील आयुक्तांनी केल्या. या सर्व कामांची पाहणी आणि रंगीत तालीम दिनांक २५ मार्च रोजी घेण्यात येणार आहे.

जी – २० शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर दुसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकांसाठी परदेशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. पहिली बैठक झाली त्यावेळी विमानतळ परिसरातील रस्त्यांनी कधी नव्हे ते कात टाकली होती. तसेच या बैठकांसाठी बीकेसी आणि कुलाबा येथील रस्ते खड्डेमुक्त करण्यात आले होते. तर पदपथ, रस्ते दुभाजक यांची रंगरंगोटी करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here