कोरडवाहूला एकरी २५ हजार तर बागायतीला एकरी ५० हजार रुपयांची तात्काळ मदत द्या

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र.

The corruption of Shinde-Fadnavis to 'Samruddhi': Nana Patole
The corruption of Shinde-Fadnavis to 'Samruddhi': Nana Patole

मुंबई : राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता नियम अटीपंचनामे या प्रशासकीय कामात वेळ न घालवता तातडीने मदत देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार रुपये व बागायती शेतीच्या नुकसानीपोटी एकरी ५० हजार रुपयांची मदत तात्काळ द्यावीअशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहेया पत्रात ते पुढे असे म्हणातात कीबळीराजा हा सातत्याने संकटाच्या दुष्टचक्रात भरडला जात आहे. यावर्षी कमी पावसाचा मोठा फटका शेतीला बसला आहेखरिप पुरता वाया गेला आणि आता रब्बी हंगामानेही घात केला आहेशेतकऱ्याचे हे वर्षच नुकसानीचे ठरले आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील पिके वाया गेली आहेत. कापूसतूरसोयाबीनकांदाधानसोयाबीनद्राक्षेआंबाडाळींबपपईकेळीऊससंत्रा या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांतील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे तर इतर जिल्ह्यातही या अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला आहेविशेषतः विदर्भमराठवाडाखान्देशात या अवकाळीचा मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. पुणेनगरनाशिक जिल्ह्यात गारपिटीने फळबागांचे मोठे नुकसान केले असून भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे.

शेतकरी जगला तरच आपण जगूआपली अन्नधान्याची गरज भागवणारा बळीराजा नैसर्गामुळे हतबल झाला आहे. एकीकडे महागाई व दुसरीकडे नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची नितांत गरज आहे. दुष्काळाचा सामना करत असताना आता अवकाळी व गागपिटीने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. सरकारने शेतकऱ्याला तात्काळ मदत करुन आधार दिला पाहिजे. पिकविमा कंपन्यांकडूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून द्यावी,  असेही नाना पटोले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here