Google Layoffs: गुगलने ४५३ भारतीयांना कामावरून काढलं, पिचाई म्हणाले…

google-india-fires-453-employees-sundar-pichai-write-to-layoff-news-update -today
google-india-fires-453-employees-sundar-pichai-write-to-layoff-news-update -today

नवी दिल्ली : सध्या जगभरात दिग्गज टेक कंपन्यांसह विविध क्षेत्रातील कंपन्या जागतिक मंदीचे कारण देत अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. यातच Google या दिग्गज टेक कंपनीने १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली.Google Layoffs CEO Sundar Pichai

पुन्हा एकदा Google ने आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गुगलच्या भारतातील युनिट्समधून कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे.

गुगल आपल्या भारताच्या युनिटमधील ४५३ कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.बिझनेस टुडेवर प्रकाशित झालेल्या बिझनेसलाईनच्या अहवालानुसार या ४५३ भारतीय कमर्चाऱ्यांना (Google indian Employee layoff) काढून टाकण्याची कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली आणि याची माहिती मेलद्वारे देण्यात आली. हा मेल गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी पाठवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here