औरंगाबाद: शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कटकट गेट परिसरातील हॉस्पिटल जवळ राहणा-या 14 वर्षीय मुलाचे लिफ्टमध्ये डोके अडकून मृत्यू झाला आहे. नववीत शिकणाऱ्या या मुलाचे आई वडील हैदराबादला गेले होते. तो एकटाच घरी होता.
तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना त्याने लिफ्टच्या बाहेर डोके काढले. लगेचच लिफ्ट सुरू होताच त्याचे शीर शरीरापासून वेगळं झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. साकिब इरफान सिद्दीकी (वय १४ वर्षे) असं मृत मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साकिबचे वडील इरफान हे टूर्स अँड ट्रॅव्हल्स कार्यालयात काम करतात. त्यांचे मुख्य कार्यालय हैदराबाद याठिकाणी आहे. कामानिमित्त त्याचे आई-वडील हैदराबादला गेले होते. साकिबला आई वडिलांनी त्याच्या आजी- आजोबाकडे ठेवले होते.
रात्री तो लिफ्टमध्ये खेळत होता. त्याने खेळता-खेळता लिफ्ट सुरू केली आणि मुंडके बाहेर काढले. तोच, त्याचे मुंडके धडावेगळे झाले. त्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ उडाली. त्याला मदत करण्याचीही संधी कोणाला मिळाली नाही. दरम्यान, रात्री उशिराला जिन्सी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.