Madrassas l सरकारी मदरसे आणि संस्कृत शाळा होणार बंद

आसाममधील भाजपा सरकारचा निर्णय

government-madrassas-and-sanskrit-schools-to-be-closed-in-assam
government-madrassas-and-sanskrit-schools-to-be-closed-in-assam

आसाममधील भाजपा सरकारने राज्यातील सरकारी मदरसे आणि संस्कृत शाळा बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे.  नोव्हेंबर महिन्यापासून या शाळा बंद करण्यात येणार आहेत. government-madrassas-and-sanskrit-schools-to-be-closed-in-assam आसामचे शिक्षण आणि अर्थमंत्री हिमांता बिस्व सरमा यांनी सांगितले.

वाचा : Railway Ticket l रेल्वे सुटण्याच्या पाच मिनिटं आधी तिकीट बुक किंवा रद्द करता येणार

हिमांता बिस्व सरमा म्हणाले की, “सरकार सार्वजनिक पैशाचा वापर धार्मिक शास्त्र शिकवण्यासाठी करु शकत नाही. यापूर्वीच आम्ही विधानसभेत या धोरणाबाबत माहिती दिली होती की, सरकारी पैशातून कुठलंच धर्मिक शिक्षण दिलं जाऊ नये” राज्य सरकार यासंदर्भात नोव्हेंबर महिन्यात औपचारिक अधिसूचना जाहीर करणार असल्याचे हिमांता बिस्व सरमा यांनी स्पष्ट केले आहे.

 ४८ कंत्राटी शिक्षकांना शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये सामावून घेणार

मदरसे बंद झाल्यानंतर ४८ कंत्राटी शिक्षकांना शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये सामावून घेतलं जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. खासगी तत्वावर संस्कृत शाळा आणि मदरशे चालवण्याबाबत सरकारचं काहीही म्हणणं नाही, असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

आसाममध्ये ६१४ सरकारी अनुदानीत मदरसे, १००० मान्यताप्राप्त संस्कृत शाळा  

आसाममध्ये ६१४ सरकारी अनुदानीत मदरसे आहेत. मुलींसाठी ५७, मुलांसाठी ३ आणि ५५४ मुला-मुलींसाठी आहेत. यामध्ये १७ उर्दू माध्यमातील आहेत. तर १००० मान्यताप्राप्त संस्कृत शाळा आहेत. यांपैकी १०० शाळांना सरकारी अनुदान दिले जाते. राज्य सरकार मदरशांवर वर्षाला सुमारे ३ ते ४ कोटी रुपये तर संस्कृत शाळांसाठी सुमारे १ कोटी रुपये खर्च होतात.

जर भाजपा सरकारने मदरसे बंद केले तर आम्ही पुन्हा उघडू AIUDF

“जर भाजपा सरकारने सरकारी मदरसे बंद केले तर पुढील वर्षी सत्तेत आल्यानंतर पुन्हा सुरु करु असं खासदार बदोद्दीन अजमल यांनी म्हटले आहे. मदरशांना बंद केल जाऊ शकत नाही. जर भाजपा सरकार ते जबरदस्तीनं बद करीत असेल तर आम्ही ५०-६० वर्षे जुने मदरसे पुन्हा सुरु करु.”

वाचा : ‘आपण कुठल्या कडेवर आहात हे मी विचारणार नाही’ रोहित पवारांचं पडळकरांना उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here