Gram Panchayat Election Results: धनंजय मुंडेंचा परळीत विजयी षटकार

gram-panchayat-election-results-2021-minister-dhananajay-munde-supporter-win-six-gram-panchayat-in-parali-beed
gram-panchayat-election-results-2021-minister-dhananajay-munde-supporter-win-six-gram-panchayat-in-parali-beed

बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे Dhananajay munde यांच्या गटानं परळीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. परळी तालुक्यातील  ग्रामपंचायतींमध्ये Gram Panchayat Election Results भाजपला दारुण पराभावाला सामोरं जावं लागले आहे. परळी तालुक्यातील 12 पैकी 10 ग्रामपंचायतींवर धनंजय मुंडे यांच्या गटानं विजय मिळवला. परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या गटानं पुन्हा एकदा वर्चस्व दाखवून दिलं आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. परळी तालुक्यातील 12 पैकी 10 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीनं वर्चस्व मिळवलं आहे.

परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

परळी तालुक्यातील 12 पैकी वंजारवाडी, रेवली, सरफराजपूर, मोहा, गडदेवाडी, वंजारवाडी , लाडझरी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीनं विजय मिळवला आहे.

परळी तालुक्यातील रेवली आणि वंजारवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. या दोन्ही ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या होत्या. भोपळा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या गटानं विजय मिळवला आहे.

राष्ट्रवादींनं या ग्रामपंचायतींवर मिळवला विजय

1 वंजारवाडी बिनविरोध
2 रेवली बिनविरोध
3 सरफराजपुर
4 मोहा
5. लाडझरी
6. गडदेवाडी

हेही वाचा : Gram panchayat Election Results l आदर्श गाव पाटोद्यातून भास्करराव पेरे पाटील बाद,पॅनलचा धुव्वा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here