दिशाच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचं ट्विट; लोकशाहीच्या मुद्द्यावरून म्हणाली…

greta-thunberg-reacts-to-disha-ravis-arrest-says-right-to-peaceful-protest-
greta-thunberg-reacts-to-disha-ravis-arrest-says-right-to-peaceful-protest-

नवी दिल्ली: आंदोलक शेतकऱ्यांना farmer protest पाठिंबा दर्शवणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने Greta thunberg टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिशा रवीच्या Disha Ravi अटकेवर प्रथमच भाष्य केलं आहे.

ग्रेटानं ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणात दिशाला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. टूलकिटमध्ये बदल करून ती पुढे पाठवल्याचा आरोप दिशावर असून, सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. दिशाच्या अटकेवरून ग्रेटानं लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करत टीका केली.

बंगळुरूतील दिशा रवी या कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी रविवारी तिच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर तिला दिल्लीतील पटियाला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं दिशाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, दिशाच्या अटकेवरून दिशाच्या अटकेवरून दिशाच्या अटकेवरून दिशाच्या अटकेवर ग्रेटा थनबर्गने पहिल्यांदाच ट्विट केलं आहे.

“अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एकत्र येऊन शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार हा वादातीत मानवाधिकार आहे. हे कोणत्याही लोकशाहीचा मूलभूत अंग असायलाच हवेत,”, असं ग्रेटानं ट्विट करून म्हटलं आहे.

दिशा रवी हिच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या एफआयआरच्या तपासाबाबत काही माध्यमांनी दिलेले वृत्त सनसनाटी निर्माण करणारे आणि पूर्वग्रहदूषित असल्याचे सूचित होत आहे, असे मत व्यक्त करत दिशाची दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

याआधी तिची पाच दिवस पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली. ती मुदत संपल्यानंतर पोलिसांनी तिला न्यायालयासमोर हजर केले तेव्हा अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांनी तिची तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

हेही वाचा:

VIDEO | विवेक ओबेरॉयला विनामास्क-विनाहेल्मेट बाईक राईड, ‘मस्ती’ नडली

Mahavitaran Recruitment 2021 | 12 वी & ITI उत्तीर्णांना संधी – महावितरणमध्ये 7000 पदांची जम्बो भरती

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here