Hathras-Gangrape : मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवा; शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी

handover-hathras-Gangrape-case-to-mumbai-police-shivsena-mla-pratap-sarnaik-demands

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा देशभरातून निषेध केला जात आहे. आता खासदार संजय राऊत यांच्यापाठोपाठ आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (shivsena-mla-pratap-sarnaik) यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. योगी सरकार हे प्रकरण बेजबाबदार आणि अमानवी पध्दतीने हातळत आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांना द्यावा, अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. (handover-hathras-rape-case-to-mumbai-police-shivsena-mla-pratap-sarnaik-demands)

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्वीटकरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या प्रकरणाच्या तपासाची विनंती केली आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी विनंती करतो.’ असे ते म्हणाले आहेत.

हाथरस येथील बलात्कार पीडित तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका केली जात आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. चार नराधमांनी तिच्यावर दृष्कृत्य करत मारहाण केली. यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान पोलिसांनी रात्री उशीरा तिच्या गावी तिचे अंत्यसंस्कार गुपचूप केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निषेध केला आहे. राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडलं हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही. या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार असून इतिहास त्यांना माफ करणार नाही. अशी टीका संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली आहे.

वाचा : या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार 

संजय राऊत यांनी म्हटलं की, “राहुल गांधी खासदार आहेत. सोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नातू तसंच राजीव गांधींचे पुत्र आहेत. या दोघांनीही देशासाठी बलिदान दिलं आहे. रक्त सांडलं आहे. याचा विसर जर कोणाला पडला असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही. ज्याप्रकारे राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडलं हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही.

विरोधी पक्षाने राज्यातील एका मुलीवर बलात्कार झाला, खून झाला त्याबद्दल आवाज उठवायचा नाही? ही कुठली लोकशाही?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे. “आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींसारख्या नेत्यांना खाली पाडत असाल तर मी म्हणेन या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here