दिल्लीत हजरत निजामुद्दीन दर्गा रविवारपासून होणार खुला

hazrat-nizamuddin-dargah-open-from-sunday-6-september-2020
hazrat-nizamuddin-dargah-open-from-sunday-6-september-2020

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले धार्मिक स्थळ काही ठिकाणी सुरु होत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये हजरत निजामुद्दीन दर्गा रविवार ६ सप्टेंबर पासून भाविकांसाठी खुला होणार आहे. फिजिकल डिस्टेंसिंग ठेवून भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. अशी माहिती दर्गा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दर्ग्याचे प्रभारी सय्यद आदिब निझामी म्हणाले

हजरत निजामुद्दीन दर्ग्याचे प्रभारी सय्यद आदिब निझामी म्हणाले, “दर्गा ६ सप्टेंबर रविवार पासून खुला होत आहे. दरम्यान, कोविड संदर्भात सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची तयारी केली आहे. लॉकडाउनमध्ये आम्ही दर्गा बंद ठेवला होता. मात्र, आता सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आम्ही दर्गा खुला करत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here