HDFC Bank l एचडीएफसी बँकेला झटका, नवीन क्रेडिट कार्ड व डिजिटल लाँचेस थांबवले

RBI चे एचडीएफसी बँकेला आदेश

hdfc-bank-outages-stop-giving-new-credit-cards-digital-launches-rbi-orders
hdfc-bank-outages-stop-giving-new-credit-cards-digital-launches-rbi-orders

नवी दिल्ली l नवीन क्रेडिट कार्ड ग्राहक जोडण्यासोबतच सर्व प्रकारच्या डिजिटल व्यवसायातील नवे व्यवहार सुरू करण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI एचडीएफसी HDFC बँकेवर तात्पुरती बंदी घातली आहे.

खासगी क्षेत्रातील बड्या अशा एचडीएफसी बँकेला हा झटका असल्याचे मानण्यात येत आहे.एचडीएफसी बँकेने मुंबई शेअर बाजाराला पत्र पाठवून सांगितले आहे की, रिझर्व्ह बँकेने दोन डिसेंबर रोजी सदर आदेश जारी केला आहे.

एचडीएफसीच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग व पेमेंट युटिलिटीसंदर्भात व्यत्यय येण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांमध्ये काही वेळा घडले होते.

हेही वाचा l  FAU-G गेम 24 तासांमध्येच हिट, युजर्सचा तुफान प्रतिसाद

यामध्ये २१ नोव्हेंबर रोजी बँकेच्या प्रायमरी डेटा सेंटरमध्ये वीजपुरवठा बंद झाल्याच्या घटनेचाही समावेश आहे, ज्यामुळे इंटरनेट बँकिंग व पेमेंट यंत्रणेत व्यत्यय आला होता.

या प्रकारांमागील त्रुटी दूर करण्यास व या घटनांची जबाबदारी कुणाची हे निश्चित करण्यासही रिझर्व्ह बँकेने सांगितल्याचे एचडीएफसी बँकेने नमूद केले आहे.

हेही वाचा l MDH मसालेचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

आम्ही आयटी यंत्रणेवर काम करत असून लवकरात लवकर यंत्रणा ठीक करू तसेच आरबीआयच्या संपर्कात राहू अशी हमी एचडीएफसी बँकेनं दिली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here