लिंबाच्या सालीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?

health-and-beauty-benefits-of-lemon-peel-update
health-and-beauty-benefits-of-lemon-peel-update

चव वाढवण्यासाठी जेवणात हमखास लिंबाचा वापर होतो. हे संत्री आणि मोसंबी प्रमाणे एक साइट्रस फळ आहे. नेहमी आपण लिंबाचा रस वापरतो आणि त्याची साल ही फेकुन देतो. मात्र, लिंबाच्या रसा इतकीच लिंबाची साल देखील गुणकारी आहेत.Health-and-beauty-benefits-of-lemon-peel-update

लिंबात बायोएक्टिव्हचे प्रमाण जास्त असते, जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. लिंबाच्या सालीत फायबर आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. एवढंच नाही तर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात असतात. एवढे जीवनसत्व असलेल्या लिंबाच्या सालीचे आज आपण फायदे जाणून घेणार आहोत.

>>लिंबाच्या सालीचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. संशोधना नुसार आपण जर रोज एक ते दोन ग्रॅम क जीवनसत्त्वाचे सेवन केले तर आपल्याला व्हायरल ताप आणि सर्दी होण्याची शक्यता ही ८ ट्क्क्यांन कमी होते.

>>अनेकदा जेवण्याच्या भांड्याला आतून चिवटपणा राहतो. साबणाने देखील हा चिवटपण जात नाही. एखादा पदार्थ करपला की भांड्याच्या तळाला डाग राहतात अशावेळी लिंबाच्या सालीने भांडी घासली की चिवटपणा लगेच निघून जातो.

>>कुकरमध्ये भात शिजवताना कुकर आतून काळा पडतो अशावेळी खाली पाण्यासोबत लिंबाची एक साल देखील ठेवावी, सालीमुळे कुकर आतून काळा होत नाही.

>>घरात मुंग्या येत असतील तर त्या जिथून येतात तिथे लिंबाची साल ठेवावी, मुंग्या किंवा इतर छोट्या कीटकांचा त्रास कमी होतो.

>>लिंबांच्या सालीचा वापर करून तुम्ही नखं स्वच्छ करू शकता. लिंबाची साल पाय किंवा हातांच्या बोटावर अलगद फिरवल्यास नखं तर स्वच्छ होतातच पण नखांवर एक वेगळीच चमक देखील येते.

>>ढोपर किंवा हाताचे कोपरे काळवंडले असतील तर त्या ठिकाणी लिंबाच्या सालीने मसाज केल्याच काळवंडलेली त्वचा उजळते. 

>>चहा किंवा कॉफी तयार करताना भांड्यावर येणार काळा थर काढण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर होऊ शकतो.

>>फ्रिजमध्ये जर दुर्गंध येत असेल तर दोन तीन लिंबाच्या साली ठेवाव्या, फ्रिजेमधी दुर्गंधी लगेच दूर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here