उपाशी पोटी प्या कोमट पाणी, ‘हे’ आहेत फायदे

Health Benefits of Drinking Hot Water
Health Benefits of Drinking Hot Water

प्रत्येकजण धावपळीमध्ये आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. परंतु सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दिवसभरात सर्वांनी कमीत कमी पाचवेळा कोमट पाण्याचं सेवन करायला हवं. पाणी पिण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. बदलत्या हवामानात गरम पाणी शरीरासाठी लाभदायक आहे.

पचनशक्ती, रक्ताभिसरण चांगलं राहण्यास मदत होते. आपल्याला चांगलं आरोग्य राखायचं असेल तर त्यासाठी एक सोपा मंत्र आहे की, आपण दररोज सकाळी झोपून उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यावं. कोमट पाणी प्यायचे इतरही फायदे आहेत.

पोट साफ होते

कोमट पाणी पिण्यामुळे आतडे संकुचित होण्यास मदत होते. यामुळे आतड्यांमधे अडकलेला जुना कचरा आपल्या शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. अनेकदा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. रोज कोमट पाणी पिण्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.

चेहऱ्यावर तेज येते

कोमट पाणी पिल्यानंतर चेहऱ्यावर तेज येतो. त्वचेवरील सुरकत्या नाहीशा होण्यासही मदत होते. शिवाय कोमट पाण्यामुळे केस लवकर केस पांढरे होणार नाहीत.

कोमट पाणी वाफ निर्माण करतं त्यामुळे पाणी प्यायल्यानंतर श्वास घेण्यात फायदा होतो. कफ असो, गळा खवखवणं की नाक ब्लॉक होणं कोमट पाणी पिणं या सर्वांवर फायदेशीर ठरतं.

भूख कमी लागण्याची समस्या होते दूर

भूख लागत नाही अशा अनेक जणांकडून तक्रारी असतात. ही समस्या पोट साफ न झाल्यामुळे असू शकते. भूख लागत नसेल तर कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि काळी मिर्ची पावडर टाकून प्यावे. तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

वजन कमी करण्यासाठी फायद्याचे

कोमट पाणी वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. आपलं इंटर्नल टेम्प्रेचर कमी करण्यासाठी आणि मेटॅबॉलिझमला अॅक्टिव्हेट करण्याचं काम कोमट पाणी करतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरतं. वजन सतत वाढत असल्यास गरम पाण्यात मध आणि लिंबू टाकून तीन महिन्यांपर्यंत पिण्याने फायदा होऊ शकतो. जर हे पाणी प्यायचे नसल्यास, जेवणानंतर एक ग्लास गरम पाणी पिणं फायद्याचं ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here