jackfruit health benefits l फणस खाण्याचे शारीरिक फायदे माहीत आहेत का?

health-benefits-of-eating-jackfruit
health-benefits-of-eating-jackfruit

फणस खाण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. फणस आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. jackfruit health benefits फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्‍शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. फणस हे जगातील सर्वात मोठे फळ आहे.

त्यामुळे फणसपोळी, फणसाचा गर, सरबत या सारख्या विविध पदार्थांमधून गृहिणी आपल्या कुटुंबाला फणस खायला देतात. त्यामुळे फणस खाण्याचे नेमके फायदे कोणते ते पाहुयात

फणस खाण्याचे फायदे jackfruit health benefits

फणसामुळे शरीराची योग्य वाढ होण्यास मदत मिळते.

अशक्तपणा, जुना ताप दूर होतो

अतिसार होत असल्यास उपयोगी

शारीरिक ताकद वाढते.

सांधेदुखी असल्यास फणसाची कोवळी पानं गरम करुन त्याचा सांध्यावर शेक द्यावा.

शरीरावर मोठे फोड किंवा बेंड झाल्यास त्यावर फणसाचा चीक लावावा. त्यामुळे सूज कमी होऊन पू बाहेर पडतो.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नियमित फणसाच्या पानांच्या रसाचे सेवन करणे फायद्याचे.

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा हा रस गुणकारी आहे.

फणसाच्या सालीपासून निघणारे दूध शरीराच्या सुजलेल्या किंवा दुखापत झलेल्या भागात लावल्यास आराम मिळतो.गुडघ्यांचे आजारही मोठ्या प्रमाणात कमी होतात.

फणसाच्या कोवळ्या पानांना बारीक करून त्यापासून लहान – लहान गोळ्या तयार करा. त्यामुळे गळ्याचे आजार कमी होतात.

पिकलेले फणस खाल्याणे पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे अपचनाच्या समस्या दूर होतात.

हेही l GHMC Elections l हैदराबादचं नाव भाग्यनगर करायला आलोय : योगी आदित्यनाथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here