जालना : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये डिसेंबर अखेरपर्यंत रूग्ण संख्येत वाढ झाली, तर त्यावेळी लॉकडाऊन lockdown हा शेवटचा पर्याय म्हणून विचार केला जाईल, असे आरोग्य health minister मंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी सांगितले.
लॉकडाऊन लागू केल्यानंतर होणारे आर्थिक परिणाम मोठे आहेत. त्यामुळे नागरिकांनी शासन, प्रशासनाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करावे. कधीही लॉकडाऊन लागू होईल अशी अफवा सध्या आसपास पसरवली जात आहे. त्याला टोपे यांनी पूर्ण विराम दिला आहे.
जालना jalna येथे रविवारी २९ नोव्हेंबर रोजी पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत राजेश टोपे बोलत होते. दरम्यान यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थित देखील उपस्थिती होती.
तर त्यावेळी काही उपायोजनात्मक निर्माण घेतले जातील
राज्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जर डिसेंबर अखेरपर्यंत रूग्ण संख्येत मोठी वाढ झाली. तर त्यावेळी काही उपायोजनात्मक निर्माण घेतले जातील. सध्या राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार राज्य शासनाचा नाही.
यापूर्वी लॉकडाऊन लागू केल्यानंतर त्याचे आर्थिक परिणाम जाणवले आहेत. राज्य अनलॉक केले आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून विचार केला जातो. कोरोनाच्या रूग्णसंख्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.
त्यामुळे नागरिकांनी सध्या शासन, प्रशासनाने कोरोना प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करावे. सध्या राज्यात लॉकडाउन लागू होणार नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे टोपे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा l ‘’विधानसभेत उलट टांगीन तुम्हाला’’,भाजपच्या माजी मंत्र्यांची पोलीस अधिका-यांना धमकी