CET EXAM : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा पुढे ढकलल्या,पाहा नवीन वेळापत्रक

here-is-revised-schedule-of-cets-to-be-conducted-under-technical-education-department
CET EXAM : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा पुढे ढकलल्या here-is-revised-schedule-of-cets-to-be-conducted-under-technical-education-department

मुंबई : राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (mahrashtra government technical-education-department) याआधी या सीईटी परीक्षा (CET Exam) या १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत घेतल्या जाणार होत्या. अखेरच्या वर्षाच्या परीक्षा १ ते २१ ऑक्टोबरदरम्यान घेतल्या जाणार होत्या. मात्र आता सीईटीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

सीईटीच्या परीक्षा आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा एकाचवेळेस येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यानअभियांत्रिकी, औषधनिर्मिती शास्त्र प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षेच्या वेळापत्रक बदललेले नाही. या परीक्षा १ ते २० ऑक्टोबरदरम्यान घेतल्या जाणार आहेत.

सीईटी परीक्षा तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी चांगलेच गोंधळात होते. जे विद्यार्थी अंतिम वर्षाचे आहेत ते सीईटीची परीक्षा कशी देऊ शकतात याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ होता. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करत होते.

कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सीईटीच्या परीक्षा रखडल्या होत्या. सुरूवातीला जूनमध्ये ही परीक्षा घेतली जाणार होती.त्यानंतर ही परीक्षा जुलै महिन्यात ढकलण्यात आली. मात्र राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्याने परीक्षा आणखी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता  ऑक्टोबरमध्ये या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

CET TIMETABLE

बदललेले वेळापत्रक

एम आर्च सीईटी –  २७ ऑक्टोबर २०२०

एम एचएमसीटी २७ ऑक्टोबर २०२०

एमसीए सीईटी  २८ ऑक्टोबर २०२०

बीएचएमसीटी  १० ऑक्टोबर २०२०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here