हिमाचल प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत:40 जागांवर विजय, भाजपाची सत्ता गेली, 25 जागा मिळाल्या; 10 पैकी 8 मंत्र्यांचाही पराभव

On Monday, agitation by the State Congress in front of SBI, LIC offices in the state
On Monday, agitation by the State Congress in front of SBI, LIC offices in the state

नवी दिल्ली:  हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांचे निकाल आज लागणार आहेत. काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हिमाचलच्या जनतेने 37 वर्षांची परंपरा कायम राखल्याचे दिसून आले. 1985 नंतर राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार पुनरावृत्ती करू शकलेले नाही. त्यानंतर काँग्रेसचे सरकार होते आणि वीरभद्र सिंह मुख्यमंत्री होते. राज्यात कायम 5 वर्षांनी सरकार बदलते. यावेळीही सरकार बदलण्याचा ट्रेंड कायम राहिल्याचे पाहायला मिळत आहे.

काँग्रेसने 40 जागांवर विजय मिळवला आहे. तर 25 जागांवर भाजपला राखता आल्या आहेत. इतर उमेदवारांनी 2 जागा जिंकल्या. ‘आप’ला  खाते उघडता आलेले नाही.

मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीच्या निकालावर ते म्हणाले की, जनतेचा निकाल आम्हाला मान्य आहे. पाच वर्षांच्या सहकार्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानतो. राज्याच्या विकासासाठी सकारात्मक विरोधी पक्षाची भूमिका बजावू.

जयराम ठाकूर यांचे 8 मंत्री पराभूत

 • जयराम सरकारमध्ये मंत्री असलेले डॉ. रामलाल मारकंडा लाहौल-स्पिती मतदारसंघातून काँग्रेसच्या रवी ठाकूर यांच्याकडून पराभूत झाले.
 • जयराम सरकारमध्ये मंत्री असलेले सरवीन चौधरी कांगडा जिल्ह्यातील शाहपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या केवलसिंग पठानिया यांच्याकडून निवडणूक हरले.
 • जयराम मंत्रिमंडळात नगरविकास मंत्री असलेले सुरेश भारद्वाज हे शिमला जिल्ह्यातील कसुम्पटी मतदारसंघातून काँग्रेसच्या अनिरुद्ध सिंग यांच्याकडून पराभूत झाले. सुरेश भारद्वाज यांनी मागील चार निवडणुका शिमला अर्बन मतदारसंघातून जिंकल्या होत्या. यावेळी भाजप हायकमांडने भारद्वाज यांची जागा बदलून त्यांना कसुम्पटी मतदारसंघातून तिकीट दिले होते.
 • सोलन जिल्ह्यातील कसौली मतदारसंघातून निवडणूक लढलेले आरोग्यमंत्री डॉ. राजीव सैजल यांचा काँग्रेसच्या विनोद सुलतानपुरी यांनी पराभव केला आहे.
 • शिक्षणमंत्री गोविंदसिंह ठाकूर यांचाही निवडणुकीत पराभव झाला. गोविंद सिंह ठाकूर यांचा मनाली मतदारसंघातून काँग्रेसच्या भुवनेश्वर गौर यांनी पराभव केला.

 काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यावर चर्चा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचलमधील विजयानंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत मंथन सुरू झाले आहे. यामध्ये हिमाचल काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंग सुखू यांच्या नावांचा विचार केला जात आहे. प्रतिभा सिंह हिमाचल प्रदेशातील मंडी येथून खासदार आहेत. हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या त्या पत्नी आहेत.

हिमाचलमध्ये पक्षाला घोडेबाजाराची भीती, चंदीगडला हलवणार; रायपूरमध्ये रिसॉर्टही बुक 

हेही वाचा: निवडणूक निकालाने भाजपाची उलटी गिनती सुरु; आता केंद्रातही परिवर्तन अटळ !: नाना पटोले

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या डोंगराळ राज्यात काँग्रेसचे सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, संभाव्य घोडेबाजार काँग्रेसने आपल्या सर्वच आमदारांना पक्ष मुख्यालयात येण्याचे निर्देश देण्यात आलेत. सध्या त्यांना राज्याबाहेर शिफ्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेसच्या गोटातील सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षश्रेष्ठींनी छत्तीगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल व हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांची हिमाचलच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. हे दोन्ही नेते लवकरच शिमला गाठणार आहेत. त्यांच्यासोबत हिमाचलचे काँग्रेस प्रभारी राजीव शुक्लाही शिमल्याला येणार आहेत.

 • काँग्रेसचे रवी ठाकूर यांनी लाहौल-स्पिती जागेवर जयराम सरकारमध्ये मंत्री असलेले डॉ. रामलाल मार्कंडा यांचा पराभव केला आहे.
 • मंडीचे पाचही जागांचे निकाल जाहीर : दीपराज कपूर यांनी कारसोग जागेवर काँग्रेसच्या महेशराज यांचा पराभव केला. सरकाघाट जागेवर दलीप ठाकूर यांनी काँग्रेसचे पवन कुमार यांचा पराभव केला. अनिल शर्मा यांनी मंडी मतदारसंघातून काँग्रेसच्या चंपा ठाकूर यांचा पराभव केला.
 • सिमला ग्रामीणमधून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह एकूण 7233 मतांनी आघाडीवर आहेत.
 • अपक्ष उमेदवार केएल ठाकूर, नालागढ आणि हितेश्वर सिंह बंजार मतदारसंघातून आघाडीवर आहेत.
 • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या गृहजिल्ह्यात भाजप चारपैकी दोन जागांवर तर काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे
 • हिमाचलमध्ये रात्री 8.55 पर्यंत मतांची टक्केवारी: काँग्रेस 53.34%, भाजपा BJP 36.7% आणि अन्य 9.02%

 CM ठाकूर यांचा रेकॉर्ड, सातव्यांदा जिंकले

सेराजमधून सीएम जयराम ठाकूर यांनी काँग्रेसचे चेतराम ठाकूर यांचा 20 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. तर मंडी जिल्ह्यातील सुंदरनगर जागेवर भाजपचे राकेश जामवाल यांनी काँग्रेसचे सोहन लाल ठाकूर यांचा 8,125 मतांनी पराभव केला. सीएम ठाकूर यांच्या गृहजिल्ह्यात भाजप क्लीन स्वीपकडे वाटचाल करत आहे. भाजपने 10 पैकी 5 जागांवर विजय मिळवला आहे, तर उर्वरित 5 जागांवरही भाजप आघाडीवर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here