Hina Khan l अभिनेत्री हिना खान कोरोना पॉझिटिव्ह, म्हणाली…तुमच्या आशिर्वादाची आवश्यकता

सोशल मीडियावरून दिली माहिती

hina-khan-tested-covid-19-positive-news-update
hina-khan-tested-covid-19-positive-news-update

देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या काही दिवसात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती यातच आता अभिनेत्री हिना खानची Hina Khan कोरोना चाचणी पॉझिटिव्ह Tested-covid-19-positive आली आहे. तुमच्या आशिर्वादाची आवश्यकता आहे. सुरक्षित रहा आणि काळजी घ्या.” अशी पोस्ट हिनाने केली आहे.

काही दिवसांपूर्वीच हिना खानच्या वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांच्या निधनामुळे हिना खान आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. त्यातच आता हिनाला कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली आहे.

हेही वाचा : अळूच्या पानामुळे शरीरातील साखरेची पातळी राहते नियंत्रणात

“सध्या मी आणि माझं कुटुंब कठीण परिस्थितीचा सामना करत असतानाच माझा कोव्हिड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी होम क्वारंटाईन झाले असून सर्व प्रोटोकॉलचं पालन करतेय. जे माझ्या संपर्कात आले असतील त्यांना विनंती करते की त्यांनी कोरोना चाचणी नक्की करून घ्यावी. तुमच्या आशिर्वादाची आवश्यकता आहे. सुरक्षित रहा आणि काळजी घ्या.” अशी पोस्ट हिनाने केली आहे.

21 एप्रिलला हिना खानच्या वडिलांचं कार्डियक अरेस्टमुळे निधन झालं होतं. यावेळी हिना खान तिच्या एका प्रोजेक्टच्या शुटींगसाठी काश्मिरमध्ये होती. वडिलांच्या निधनानंतर चार दिवसांनी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत काही दिवस सोशल मीडियावरून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं होतं.

”माझे वडिल 21 एप्रिल 2021 रोजी स्वर्गवासी झाले. ज्यांनी ज्यांनी माझ्या या कठिण काळात माझं सांत्वन केलं, त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. या धक्क्यातून मी आणि माझे कुटूंब अजुनही सावरू शकलो नाही. त्यामुळे पुढचे काही दिवस मी सोशल मिडीयावरून ब्रेक घेतेय. माझी टीम माझ्या सर्व प्रोजेक्टबद्दल माहिती देईल. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि सहकार्यासाठी खूप खूप आभार. ” असं ती या पोस्टमध्ये म्हणाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here