केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुस-यांदा ‘एम्स’मध्ये अ‍ॅडमिट

bjp-not-take-resignation-of-amit-shah-after-d-g-vanjara-acquisition-in-2002-asks-congress-spokesperson-sachin-sawant
bjp-not-take-resignation-of-amit-shah-after-d-g-vanjara-acquisition-in-2002-asks-congress-spokesperson-sachin-sawant

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा एकदा ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले आहे. श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने शाह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Home minister Amit Shah re-admitted to AIIMS)

गेल्या दीड महिन्यात त्यांना तिसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले आहे. शाह यांना शनिवारी (12 सप्टेंबर) रात्री 11 वाजता ‘एम्स’मध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 2 ऑगस्ट रोजी समोर आली. अमित शाह यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात आले. जवळपास दहा ते बारा दिवसांच्या उपचारानंतर शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमित शाह यांनी 14 ऑगस्टला स्वत: ट्विटरवर माहिती देत कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले.

थकवा आणि अंगदुखी ही पोस्ट कोव्हिड लक्षणे दिसल्याने अमित शाहांना 18 ऑगस्टला ‘एम्स’मध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले होते. जवळपास दोन आठवड्यांच्या उपचारानंतर शाह यांना 31 ऑगस्टला घरी सोडण्यात आले होते.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here