Honda H’Ness CB350 : होंडाची नवी Honda H’Ness CB350 बाइक लाँच,पाहा VIDEO

रॉयल एनफिल्डला देणार टक्कर, शोरूम किंमत १.९ लाख रुपयांपासून

honda-launches-new-bike-hness-cb350
honda-launches-new-bike-hness-cb350

होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडियाने (HMSI)  350 सीसी इंजिन श्रेणीची मोटरसायकल बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीने जगासमोर आपली ‘हायनेस सीबी 350′(Honda H’Ness CB350) प्रथमच आणली आहे. कंपनीने म्हटले आहे की, देशातील या श्रेणीतील वेगाने वाढणारी बाजारपेठ लक्षात घेता, त्यांनी ही नवी बाईक आणली आहे.

VIDEO पाहा H’Ness CB350

हायनेस सीबी 350 ही बाइक बीएस -6 मानकांशी अनुरूप आहे. कंपनी आपल्या ‘बिग विंग’ विक्री नेटवर्कच्या माध्यमातून ती विकेल. त्याचे दोन मॉडेल डिलक्स आणि डिलक्स प्रो आहेत. या मोटारसायकलची शोरूम किंमत १.९ लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Honda H'Ness CB350

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अत्सुशी ओगाता यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘कंपनीच्या जगभरातील सीबी मालिकेतील ही अगदीच नवीन पेशकश आहे. याची किंमत १.९ लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.’ ते म्हणाले की, कंपनीने‘बिग विंग’स्टोअरमध्ये त्याची बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कंपनीची अशीही योजना आहे की,  आपल्या बिग विंग विक्री नेटवर्कचा विस्तार देशभरात करावा. ओगाता म्हणाले की, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपनीकडे देशभरात असे ५० बिग विंग स्टोअर्स असतील.

Honda H'Ness CB350

‘हायनेस सीबी’ 350०’ ही बाइक ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात देशांतर्गत उत्पादित केली गेली आहे. हरियाणाच्या मानेसर येथील कंपनीच्या प्लांटमध्ये याची निर्मिती केली जात आहे. कंपनीने म्हटले आहे की, प्रथम त्यांचा प्रयत्न हा भारतीय बाजाराची मागणी पूर्ण करण्यावर असणार आहे. त्यानंतर ते इतर देशातील बाजारपेठेत प्रवेश करतील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here