Honda Bikes: होळीपूर्वी अवघ्या ३,९९९ रुपयात घरी न्या होंडाची ही ढासू बाईक, मायलेजमध्ये आहे बाप!

Honda Bikes: भारतात सर्वाधिक मागणी ही दुचाकींना आहे. हिरो, होंडा, टीव्हीएस, बजाज आणि यामाहा अशा अनेक कंपन्या बाजारात आहेत. भारतात ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया’ (Honda) ही दुसऱ्या क्रमाकांची लोकप्रिय कंपनी आहे. आता जर तुम्हाला उत्तम मायलेज देणारी परवडणारी बाईक घ्यायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Honda आपल्या Shine वर मर्यादित काळासाठी सूट देत आहे. जिथे तुम्ही फक्त ३,९९९ रुपये डाउन पेमेंट भरून ही बाईक तुमच्या घरी नेऊ शकता. या व्यतिरिक्त, तुम्हाला ही बाईक खरेदी करण्यावर इतर ऑफर्स देखील मिळतात, चला तर जाणून घेऊया काय आहे ऑफर…

Honda Shine डिस्काउंट ऑफर

केवळ ३,९९९ रुपयांच्या डाउन पेमेंटशिवाय, तुम्हाला ही बाईक खरेदी करण्यासाठी कमी व्याज देखील द्यावे लागेल. होंडा शाइन खरेदी करणाऱ्यांना ७.९९ टक्के व्याज द्यावे लागेल. त्याच वेळी, कंपनी ५,००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील देत आहे. ही मर्यादित ऑफर केवळ ३१ मार्चपर्यंत वैध आहे.

कॅशबॅक ऑफर

कॅशबॅक ऑफर किमान ४०,००० च्या व्यवहारांवर लागू आहे आणि SBI क्रेडिट कार्डसह सहा महिने आणि त्याहून अधिक कालावधीच्या EMI व्यवहारांवर याचा लाभ घेता येईल. दरम्यान, कर्जाचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना वित्त योजना ऑफर केली जाईल.

Honda Shine ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटारसायकलींपैकी एक आहे. जानेवारी २०२३ मध्ये, शाईन ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणारी दुसरी मोटरसायकल होती. भारतीय बाजारपेठेत १२५सीसी सेगमेंटमध्ये मोटरसायकल स्पर्धा करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here