
Indian Railway : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी सामानाबाबत काही नियम तयार केले आहेत. हे नियम प्रवासाला निघण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाने जाणून घेणे गरजेचे आहे. या नियमांनुसार, प्रत्येक कोचनुसार प्रवाशांना सोबत घेऊन जाणाऱ्या मोफत सामानाची मर्यादा वेगळी आहे.
प्रत्येक कोचसाठी ठरलेली सामान मर्यादा
फर्स्ट एसी (क्लास : या क्लासच्या प्रवाशांना 70 किलोपर्यंतचे सामान सोबत घेऊन जाण्याची परवानगी आहे.
सेकंड एसी क्लास: या क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी ही मर्यादा 50 किलो नश्चिति करण्यात आली आहे.
थर्ड एसी आणि स्लीपर क्लास: या क्लासमधील प्रवाशांना 40 किलोपर्यंतचे सामान मोफत घेऊन जाता येते.
जनरल क्लास: या क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी ही मर्यादा 30 किलो आहे. याव्यतिरक्ति, प्रत्येक प्रवाशाला 10 किलोपर्यंतचे अतिरक्ति सामान घेऊन जाण्याचीही परवानगी आहे. मात्र, जर सामानाचे वजन ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर त्या सामानाची ‘पार्सल’ म्हणून बुकिंग करणे अनिवार्य आहे.
नियम का महत्त्वाचे?
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नियम प्रवाशांवर कोणताही अतिरक्ति बोजा टाकण्यासाठी नाहीत, तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी आवश्यक आहेत. अनेकदा प्रवाशी विना-बुकिंग जास्त सामान घेऊन प्रवास करतात, ज्यामुळे कोचमध्ये गर्दी वाढते आणि इतर प्रवाशांना जागेच्या समस्येचा सामना करावा लागतो. याशिवाय, जास्त सामान सुरक्षा यंत्रणांसाठीही धोकादायक ठरू शकते.
पुढच्या वेळी तुम्ही ट्रेनने प्रवासाला निघाल्यास, तुमच्या सामानाचे वजन नश्चिति मर्यादेपेक्षा जास्त नाही, याची खात्री करा. अन्यथा, प्रवासादरम्यान तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रेल्वेचे हे नियम प्रवासाला अधिक सुरक्षित आणि सोयीचे बनवण्यासाठी आहेत.






















































































































































































