नाशिक : फेब्रुवारी -मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या- परीक्षेसाठी अर्ज (आवेदनपत्रे) भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. याअंतर्गत नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत बुधवार (३० नोव्हेंबर) पर्यंत वाढविली आहे. विलंब शुल्काकसह शुक्रवार (२ डिसेंबर) पर्यंत अर्ज भरता येईल. या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सूचना जारी केली आहे.
उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्रा, कला व वाणिज्यम शाखांची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटाबेसवरुन ऑनलाइन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमित विद्यार्थ्यांसह सर्व शाखांचे पुर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट विद्यार्थ्यांना नियमित शुल्काेने आवेदनपत्रे भरण्यास मुदतवाढ दिली जात आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार बुधवार (ता.३०) पर्यंत नियमित शुल्कातसह परीक्षा अर्ज भरता येतील. पुढील दोन दिवस शुक्रवार (ता.२) पर्यंत विलंब शुल्कादसह अर्ज भरण्याची मुदत असेल. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन काढून शुल्के बँकेत भरण्यासाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदत असेल. तर चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या, प्रिलिस्टर जमा करण्याची मुदत ७ डिसेंबरपर्यंत असेल.