GHMC Elections l हैदराबादचं नाव भाग्यनगर करायला आलोय : योगी आदित्यनाथ

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणूक प्रचार l GHMC Hyderabad

hyderabad-can-be-renamed-as-bhagyanagar-says-yogi-adityanath
hyderabad-can-be-renamed-as-bhagyanagar-says-yogi-adityanath

हैदराबाद l ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका Greater Hyderabad Muncipal Corporation  (GHMC) निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ yogi adityanath यांनी मल्काजगिरी या ठिकाणी रोड शो केला. त्यावेळी आपण हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे अशी गर्जना योगी आदित्यनाथ यांनी केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी शनिवारी तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी मलकजगिरी भागात रोड शो केला. यावेळी त्यांनी एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना लक्ष्य केले. या रोड शोला प्रचंड गर्दी होती.

योगी आदित्यनाथ म्हणाले,मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही?

“मला काही लोकांनी विचारलं की हैदराबादचं नाव भाग्यनगर होऊ शकतं का? मी म्हटलं का नाही? आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही? ” असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

ओवेसी यांनी या निवडणुकीसाठी येथे 51 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. हैदराबाद महापालिका निवडणुकीतही असदुद्दीन ओवेसी यांनी जुन्या हैदराबाद भागातही आपल्या पक्षाचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. भाजपाला प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन देखील त्यांनी या वेळी केलं.

हेही वाचा l Covishield vaccine l PM मोदींच्या सीरम भेटीनंतर अदर पुनावालांनी दिली ‘ही’ माहिती

हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. जे.पी. नड्डा, योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे देखील हैदराबादेत तळ ठोकून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here