नवी दिल्ली: कोरियातील प्रसिध्द बुसान मोटर शोमध्ये Hyundai ने ग्राहाकांसाठी नवीन इलेक्ट्रिक कार RN22e चे उद्घाटन केले. कंपनीने आगामी इलेक्ट्रिक कार Ioniq 5 EV ला सुद्धा भारतात आणण्याची घोषणा केली. ही कार ‘N लाइन’ ट्रीटमेंट प्राप्त करणारी पहिली EV बनण्यासाठी तयार आहे.
समोर आलेली RN22e कॉन्सेप्ट कार Hyundai Ioniq 6 EV वर बेस्ड आहे. कंपनी RN सीरीजला “रोलिंग लैब कॉन्सेप्ट्स” म्हणतात. या कारमध्ये इलेक्ट्रिक ड्राइवट्रेन आणि मिड-इंजनसारखे लेआउट विकसित करण्यासाठी Hyundai Veloster बॉडीशेलचा उपयोग केला होता. परंतू प्रॉडक्शन लाइनमध्ये एंट्री करणारी कार ही कॉन्सेप्ट कारपासून खुप वेगळी असणार. ही कार सध्या कंपनीच्या भविष्याच्या मॉडलसाठी एक विकास मंच म्हणून काम करत आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, नवी RN22e उत्पादन वाहन साठी बनवलेल्या आता पर्यंतच्या सर्वात जवळच्या RN च्या रुपात समोर आली आहे. Ioniq 6 सेडानच्या आधारावर कंपनी ने डीप एयर डैम्स, डिफ्यूज़र, एक वेगळा स्पॉइलर, मोठी चाकांचे हे मॉडल बाहेरच्या लुकमध्ये डिजाइन करण्यात आले त्यामुळे कार अधिक आकर्षक दिसत आहे.
RN22eची गति 250 किमी प्रति तास
Hyundai RN22e च्या पावरट्रेनमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आलाय. जे कारच्या चारही टायरला चालविण्यास मदत करते. एकूण मोटर 585hpच्या जवळपास आहे. कारमध्ये फ्रंट आणि रियर एक्सलच्यामध्ये टॉर्क स्प्लिट फंक्शनपण आहे. या कारमध्ये 400-वी / 800-वी फास्ट मल्टी-चार्जिंग क्षमता सोबत 77.4 kWh बैटरी पॅक आहे. ब्रांडनुसार RN22eची गति 250 किमी प्रति तास अधिक आहे.