पराभव साजरा करण्याची खिलाडू वृत्ती माझ्यात आहे – पंकजा मुंडे

I have a player attitude to celebrate defeat Says Pankaja Munde
I have a player attitude to celebrate defeat Says Pankaja Munde

पुणे l पराभव साजरा करण्याची खिलाडू वृत्ती माझ्यात आहे. इतके दिवस सगळे म्हणत होते ताई घराच्या बाहेर पडत नाहीत. आता बाहेर पडले तर म्हणत आहेत की पराभव साजरा केला. असं म्हणत पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी धनंजय मुंडे Dhananjay munde यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

पराभव साजरा करण्याचं नशीब कुणाचं असतं? पराभव साजरा केला तर त्यात गैर काय?  धनंजय मुंडे यांनी माझ्यावर काय टीका मला कल्पना नाही.

हेही वाचा l रामदास आठवले यांना कोरोना,पायल घोषही करणार तपासणी

पण एखादी पराभूत व्यक्ती जर नांदेडपासून आठ जिल्ह्यांमधलं स्वागत स्वीकारत येत असेल आणि त्याचा एवढा मोठा मेळावा होत असेल तर ही पुण्याईच असं पंकजा मुंडे Pankaja Munde म्हणाल्या.

पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी दसऱ्याच्या दिवशी भगवान गडावर मेळावा घेतला. या मेळाव्याला फक्त ५० लोकांच्या उपस्थितीची संमती देण्यात आली होती.

मात्र या मेळाव्याला बरीच गर्दी झाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी काही लोक पराभव साजरा करतात असं म्हणत पंकजा मुंडे Pankaja Munde यांचंं नाव न घेता टीका केली होती.

हेही वाचा l भाजपातील हिंदुत्ववाद्यांनी गाईवरून हिंदू-मुसलमानांत दंगली भडकवल्या : शिवसेना

पंकजा मुंडे Pankaja Munde आणि धनंजय मुंडे हे आज मंगळवारी उसतोड कामगारांविषयीच्या बैठकीसाठी एकत्र आले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता त्यांनी पराभव साजरा करण्यात गैर काय असं म्हटलं आहे.

उसतोड कामगारांचे नेतृत्व हा माझ्यासाठी महत्त्वाचा विषय नाही तर त्यांचं पालकत्व माझ्यासाठी महत्त्वाचं आहे असं पंकजा मुंडे Pankaja Munde यावेळी म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here