IBPS PO 2022 Exam l बँक पीओमध्ये ६ हजार ४३२ पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज करायची शेवटची तारीख

IBPS-PO-2022-Exam-recruitment-for-more-than-6000-posts-of-bank-po-know-last-date-to-apply-today
IBPS-PO-2022-Exam-recruitment-for-more-than-6000-posts-of-bank-po-know-last-date-to-apply-today

नवी दिल्ली : इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने आयबीपीएस पीओ अधिसूचना २०२२ जारी केली आहे. त्यानुसार बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी ६००० हून अधिक जागा रिक्त आहेत. बँक पीओच्या एकूण ६४३२ पदांवर ही भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार आज, २ ऑगस्ट २०२२ पासून आयबीपीएस पीओ २०२२ साठी अर्ज करू शकतात.

पात्रता आणि वयोमर्यादा

पदवी पूर्ण केलेले २० ते ३० वयोगटातील तरुण आयबीपीएस पीओ भर्ती २०२२ साठी अर्ज करू शकतात. १ ऑगस्ट २०२२ च्या आधारावर वयोमर्यादा मोजली जाईल. त्याच वेळी, उमेदवारांना २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत पदवीधर असणे अनिवार्य आहे.

आयबीपीएस पीओ २०२२ परीक्षा: परीक्षेची तारीख

आयबीपीएस पीओ परीक्षा २०२२ द्वारे प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तथापि, आयबीपीएस पीओ २०२२ परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. प्राथमिक परीक्षा ऑक्टोबरमध्ये आणि मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये घेतली जाण्याची शक्यता आहे, तर मुलाखत पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये घेतली जाईल.

आयबीपीएस पीओ वेतनाची रचना सतत बदलत राहते. सध्या, बँकेत पीओला सुमारे ५२००० ते ५७००० रुपये पगार मिळतो. मूळ वेतन २३७०० रुपयांपासून सुरू होते आणि ४ वेळा पगार वाढ मिळते.

अर्ज कसा करावा?

बँक पीओ परीक्षा देण्यास इच्छुक उमेदवारांना प्रथम ibps.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह स्व-घोषणा पात्र अपलोड करावे लागेल. आयबीपीएस पीओ २०२२ साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२२ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here