Gram Panchayat Election Results : महाविकासआघाडीच्या पारड्यात ८० टक्के जागा, १३ जिल्ह्यांमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची पत्रकार परिषदेत माहिती

Pradesh Congress's two-day 'Navasankalp Workshop' in Shirdi!
Pradesh Congress's two-day 'Navasankalp Workshop' in Shirdi!

मुंबई: “ग्रामपंचायत निवडणूक निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीतील ८० टक्के जागा महाविकासआघाडीमधील पक्षांना मिळालेल्या आहेत. महाविकासआघाडीवर Maha vikas Aghadi जनतेने विश्वास दाखवला आहे. आम्ही केलेल्या कामांवर लोकं समाधानी आहेत.” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात Balasaheb thorat यांनी म्हटलं आहे. तसेच, चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवला असल्याचेही थोरात यांनी सांगितले आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरु झाली आहे. अनेक ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाने घेतलेल्या पत्रकारपरिषदेनंतर, काँग्रेसने देखील पत्रकारपरिषद घेत या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाची माहिती दिली.

हेही वाचा: अर्णब गोस्वामींचं कोर्ट मार्शल करणार का? शिवसेनेचा सवाल

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, “कोल्हापूर, नंदुरबार, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, उस्मानाबाद, वाशी, बुलढाणा या १३ जिल्ह्यांमध्ये काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष राहिलेला आहे.

याशिवाय विदर्भामधील यश लक्षणीय आहे, ५० टक्के जागा काँग्रेसला मिळाला असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. निर्विवाद यश विदर्भात काँग्रेसला मिळाल्याचं दिसून येत आहे. मराठवड्यात देखील अनेक ठिकाणी काँग्रेसला यश मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

हेही वाचा : Gram Panchayat Election Results: धनंजय मुंडेंचा परळीत विजयी षटकार

अजून अनेक ठिकाणचे निकाल समोर यायचे आहेत. एकूणच १४ हजार ग्रामपंचायतीं पैकी चार ते साडेचार हजार ग्रामपंचायती काँग्रेसला मिळाल्या आहेत.”तसेच, “राज्यात भाजपाची पिछेहाट या निवडणुकीतून दिसून येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व माजी प्रदेशाध्यक्ष यांची स्वतःची गावं देखील त्यांच्या ताब्यात राहिलेली नाहीत. या ठिकाणी भाजपाला विजय मिळवता आलेला नाही.

मात्र खोटं बोलण्यात ते पटाईत असल्याने ते माध्यमांवर कदाचित वेगळं काही सांगू शकतात. पंरतु हे स्पष्टपणे दिसत आहे की या निवडणुकीत भाजपाची मोठी पिछेहाट झालेली आहे. महाविकासआघाडीला चांगलं यश मिळालेलं आहे.” असं देखील थोरात यांनी यावेळी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here