औरंगाबादेत बड्या बिल्डरांवर आयकरची 11 ठिकाणी छापेमारी, 200 अधिकारी कर्मचारी धडकल्याने बिल्डरलॉबीमध्ये घबराट!

Income tax raids on big builders in Aurangabad at 11 places, 200 officers and employees were hit, panic in the builder lobby!
Income tax raids on big builders in Aurangabad at 11 places, 200 officers and employees were hit, panic in the builder lobby!

औरंगाबाद: शहरातील बड्या बिल्डर लॉबीवर एकाच वेळी आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. आज गुरुवारी पहाटे आयकरचे बडे अधिकारी- कर्मचारी असा तब्बल 200 जणांचा ताफा 11 बड्या बिल्डरच्या बंगले अन कार्यालयात घुसला. या कारवाईने शहरातील बांधकाम क्षेत्र हादरले आहे. मंजीत प्राईड, दिशा ग्रुप यासह लाभशेटवार आदी बडे बिल्डरांवर छापे पडल्यानी बिल्डर लॉबीमध्ये घबराट पसरली आहे. या कारवाईबाबत आयकर विभागाने मोठी गुप्तता पाळली असून किमान दोन दिवस ही कारवाई चालणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. आयकर विभागाच्या कारवाईने औरंगाबाद शहरात एकच खळबळ उडाली आहे. Income tax raids on big builders in Aurangabad at 11 places, 200 officers and employees were hit, panic in the builder lobby 

राज्यातील नाशिकसह अनेक शहरात आयकर विभागाने आज छापेमारी केली. शहरातीलही अनेक प्रतिष्ठीत बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने एकाच वेळी कारवाई केली. आयकर विभागाने अतिशय गुप्तपणे ही कारवाई केली आहे. आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी बुधवारी सायंकाळीच शहरात दाखल झाले होते. कुणालाही खबरबात लागू नये यासाठी सरकारी कार ऐवजी खासगी गाड्यांमधून जवळपास 200 अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा शहरात दाखल झाला. सकाळी 6 वाजेपासूनच कारवाईला सुरूवात झाली. रेल्वेस्टेशन परिसरातील काही बिल्डरांच्या बंगल्यात आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले. त्याचबरोबर इतर प्रत्येकी आठ ते दहा अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक वेगवेगळ्या बिल्डरांच्या घर आणि कार्यालयात दाखल झाले. शहरातील मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या बांधकाम व्यावसायिकांच्या बंगले आणि कार्यालयांवर एकाच वेळी छापा टाकण्यात आला आहे. 

या बिल्डरांवर पडले छापे…

मनजित प्राईड, दिशा ग्रुप, मनजीत कॉटन, अनिल मुनोत, मनोज काला, मनोज रूणवाल, लाभशेटवार ग्रुप, गादीया ग्रुप आदी बिल्डर आणि बांधकाम प्रतिष्ठाणांवर आयकर विभागाने छापा टाकल्याचे सुत्रांनी सांगितले.

अनेकांचे मंत्र्यांशी लागबांधे

शहरातील बिल्डर लॉबीचे बड्या राजकीय मंडळींशी लागेबांधे आहेत. अनेक बांधकाम प्रतिष्ठानांचे तर राज्यातील मंत्री आणि सत्तेतील घनिष्ठ वर्तूळातही उठबस आहे. अशा वेळी आयकर विभागाने केलेल्या कारवाईने बांधकाम क्षेत्र हादरले आहे. ही कारवाई दोन तीन दिवस चालणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

तपासली कागदपत्रे…

आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात बिल्डरांच्या घर आणि कार्यालयातून अनेक दस्तावेज हस्तगत केल्याचे समजते. कोणते प्रकल्प आणि त्यावरची गुंतवणूक याचीही माहिती आयकर विभागाकडू गोळा केली जात असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here