नवी दिल्ली: जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत (Most popular Leader) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सलग तिसऱ्यांदा पहिलं स्थान मिळवलं आहे. अमेरिेकेतील डेटा इंटेलिन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टच्या सर्व्हेनुसार ७५ टक्के रेटिंगसह (75 Percent Rsting ) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत नंबर वन झाले आहेत.
नरेंद्र मोदींनंतर मेक्सिकोचे अध्यक्ष मॅन्युअल लोपेज आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अॅल्बेनस यांचा क्रमांक लागतो. मॅन्युअल यांना ६३ टक्के रेटिंग मिळालंय तर अँथनी अॅल्बेनस यांना ५८ टक्के रेटिंग आहे. जगभरातल्या २२ लोकप्रिय नेत्यांचीही यादी आहे. त्यात नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. भारतासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
मॉर्निंग कन्सल्टने जगभरातल्या नेत्यांबाबत केला सर्व्हे
मॉर्निंग कन्सल्ट हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. जगभरातल्या निवडणुका, राजकारणी यांच्याबाबत रिअल टाइम माहिती पुरवण्याचं काम या प्लॅटफॉर्मद्वारे होतं. मॉर्निंग कन्सल्टकडून दर आठवड्याला ही माहिती पुरवली जाते. रोज ते सुमारे २० हजार ऑनलाइन मुलाखती घेत असतात.
मॉर्निंग कन्सल्टने जाहीर केलेल्या यादीत कोणती पाच प्रमुख नावं आहेत त्यांचं रेटिंग किती?
१) नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत- ७५ टक्के रेटिंग
२) अँड्रस मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर, अध्यक्ष मेक्सिको- ६३ टक्के रेटिंग
३) अँथनी अॅल्बेनस, पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया- रेटिंग ५८ ट्क्के
४) मारियो ड्रागी, इटली, ५४ टक्के रेटिंग
५) इग्नाझिओ कॅसिस, स्वित्झर्लंड, रेटिंग -५२ टक्के
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ४१ टक्के रेटिंग मिळालं आहे. मॉर्निंग कन्सल्टकडून हा जागतिक दर्जाचा सर्व्हे करण्यात आला आहे. एके वेळी भारत या देशाच्या पंतप्रधानाचं नावं जागतिक स्तरावर माहिती असणं हे देखील दुर्मिळ होत पण आज त्याचं भारताच्या पंतप्रधानाने जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावणे ही भारतासाठी महत्वाची बाब आहे.
Global Leader Approval: *Among all adults
Modi: 75%
López Obrador: 63%
Draghi: 54%
Bolsonaro: 42%
Biden: 41%
Trudeau: 39%
Kishida: 38%
Macron: 34%
Scholz: 30%
Johnson: 25%…view the full list: https://t.co/wRhUGsLkjq
*Updated 08/25/22 pic.twitter.com/akVltXdfQk
— Morning Consult (@MorningConsult) August 26, 2022
मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स कडून केलेली ही रेटिंग 17 ते 23 ऑगस्ट 2022 पर्यंत गोळा केलेल्या डेटाच्या आधारे काढण्यात आली आहे. ही रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ रहिवाशांच्या सात दिवसांच्या सरासरीवर काढण्यात आली आहे.
काय आहे अमेरिेकेतील डेटा इंटेलिन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टच्या सर्व्हे
मॉर्निंग कन्सल्टने जो सर्व्हे केला त्यामध्ये विविध देशातले लोक सहभागी झाले होते. याआधी म्हणजेच २०२०, २०२१ या दोन वर्षातही जो सर्व्हे या वेबसाईटने केला त्या सर्व्हेत पहिल्या क्रमांकावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होते आणि आता सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर राहण्याची हॅटट्रिक मोदींनी साधली आहे.