India vs England : हिटमैन रोहित शर्माची दमदार सेंच्युरी

india-vs-england-2nd-test-live-score-update-ind-vs-eng-today-match-day-1-latest-update
india-vs-england-2nd-test-live-score-update-ind-vs-eng-today-match-day-1-latest-update

चेन्नई : टीम इंडिया Team India आणि इंग्लंड England यांच्यात शनिवारी दुसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली. टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. लँचपर्यंत टीम इंडियाने तीन विकेट्स गमावले होते. टीम इंडियाकडून रोहित शर्मा Rohit sharma जबरदस्त बॅटिंग करत चांगला स्कोअर उभा करत आहे. रोहित शर्माने दमदार बॅटिंग करत सेंच्युरी झळकावली आहे. रोहित शर्माने 130 बॉल्समध्ये सेंच्युरी केली.

टॉस जिंकल्यावर बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. शुभमन गिल याला खाते सुद्धा उघडता आले नाही आणि शून्यावर माघारी परतला. यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 85 रन्सची पार्टनरशिप केली. चेतेश्वर पुजारा 21 रन्स करुन आऊट झाला. कॅप्टन विराट कोहली सुद्धा शून्यावर आऊट झाला. सध्या रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे क्रिजवर खेळत आहेत.

दोन्ही टीम्समध्ये बदल

टीम इंडियाने दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये आपल्या टीममध्ये एकूण तीन बदल केले आहेत. अक्षर पटेल याला टेस्ट डेब्यूची संधी देण्यात आली आहे. अक्षर पटेल भारताचा 302वा टेस्ट क्रिकेटर बनला आहे. वॉशिंग्टन सुंदर याच्या जागी कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह याच्या ऐवजी मोहम्मद सिराज याला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. तर इंग्लंडच्या टीममध्ये क्रिस वोक्स याला 12वा प्लेअर आणि ओली स्टोन याला खेळण्याची संधी देण्यात आली आहे.

अशा आहेत टीम्स 

टीम इंडिया :

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज.

इंग्लंडची टीम :

डॉम सिबले, रोरी बर्न्स, डान लॉरेन्स, जो रूट, बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स, मोईन अली, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड आणि ओली स्टोन.

प्रेक्षकांवर CCTV ची नजर

तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे सचिव रामासैमी यांनी सांगितले की, प्रत्येक दोन व्यक्तींमध्ये एक सीट रिकामे ठेवले जाईल. याशिवाय, सोशल डिस्टेंसिगवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व स्टेडियममध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत. प्रेक्षक स्टेडियममध्ये फक्त मोबाइल घेऊन जाऊ शकतील. स्टँड्समध्ये बॉल गेल्यावर अंपायर बॉलला सॅनिटाइज करेल.

पवेलियनमध्ये प्रेक्षकांना एंट्री नाही

रामासैमी पुढे म्हणाले की, ‘स्टेडियमची क्षमता 32 हजार प्रेक्षकांची आहे, पण फक्त 14 हजार प्रेक्षकांना एंट्री मिळेल. पवेलियन साइडला रिकामे ठेवले जाईल, कारण तिथे खेळाडून बसतात. बायो-बबलमुळे पवेलियनला रिकामे ठेवले जाईल. येथे फक्त अधिकारी आणि स्टाफसह 600 लोक उपस्थित असतील.’

हेही वाचा: 

अशा राज्यपालांचे पूर्ण वस्त्रहरण होण्याआधी गृहमंत्रालयाने त्यांना परत बोलवायला हवे!

Petrol-Diesel Price:5वें दिन पेट्रोल डीजल हुआ महंगा, 100 रु लीटर के करीब, जानें अपने शहर का भाव

shaheen-bagh: SC ने खारिज की पुनर्विचार याचिका, कहा- धरना कहीं भी कभी नहीं किया जा सकता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here