Asia Cup 2023 Final India vs Sri Lanka : शेवटी, आशिया चषक २०२३ची सांगता होणार आहे. १९ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील १३वा आणि शेवटचा सामना आज खेळवला जात आहे. भारत आणि श्रीलंकेचे संघ अंतिम फेरीत आमनेसामने आहेत. विजेतेपदाच्या लढतीत श्रीलंकेने भारतासमोर केवळ ५० धावांचे माफक आव्हान ठेवले आहे. आजच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मात्र एकतर्फी लढत पाहायला मिळाली. मोहम्मद सिराज याने घेतलेल्या ६ व हार्दिक पांड्या याने घेतलेल्या ३ विकेट्सच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेचा डाव केवळ ५० धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर भारताने फार वेळ न घेता ६.१ षटकात १० गडी राखून श्रीलंकेचा धुव्वा उडवला. इशान किशन आणि शुबमन गिल यांनी नाबाद ५१ धावा करत टीम इंडियाला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवून दिला.
भारताने सात वेळा तर श्रीलंकेने सहा वेळा हे विजेतेपद पटकावले होते. गेल्या वेळी भारताने २०१८ मध्ये आशिया चषक जिंकला होता आणि आता पाच वर्षांनंतर आठव्यांदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया चषकावर नाव कोरले आहे.
Innings Break!
Sensational bowling display from #TeamIndia! ⚡️ ⚡️
6⃣ wickets for Mohd. Siraj
3⃣ wickets for vice-captain Hardik Pandya
1⃣ wicket for Jasprit BumrahTarget 🎯 for India – 51#AsiaCup2023 | #INDvSL pic.twitter.com/kTPbUb5An8
— BCCI (@BCCI) September 17, 2023
इंडियाचा १० गडी राखून श्रीलंकेवर दणदणीत विजय
रविवारी (दि. १७ सप्टेंबर) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअम येथे पार पडणाऱ्या आशिया चषक २०२३ स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका संघ आमनेसामने आले. आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मात्र एकतर्फी लढत पाहायला मिळाली. मोहम्मद सिराज याने घेतलेल्या ६ व हार्दिक पंड्या याने घेतलेल्या ३ विकेट्सच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेचा डाव केवळ ५० धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर सलामीवीर शुबमन गिल आणि इशान किशन यांनी फार वेळ न घेता सहा षटकातच सामना जिंकला. भारताने १० गडी आणि ४३.५ षटके राखून श्रीलंकेचा धुव्वा उडवला. टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय आहे. या विजयासह भारताने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले.