मोदी- ट्रम्प दोस्तीचे दुष्परिणाम आता भारताला भोगावे लागणार

काँग्रेस प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांची टीका

india-will-pay-the-prize-for-modi-and-trump-friendship-says-congress-spokesperson-anand-gadgil
india-will-pay-the-prize-for-modi-and-trump-friendship-says-congress-spokesperson-anand-gadgil

मुंबई : अमेरिकेच्या लौकिकाला बाधा पोहोचवणाऱ्या कालच्या घटनेस जबाबदार असलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald trump यांच्यासारख्या बेजबाबदार व्यक्तीसाठी लाखो रुपये खर्च करून पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra modi यांनी अहमदाबाद येथे ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी एक मोठी रॅली आयोजित केली होती. निवडणुकीत उमेदवार असलेल्या दुसऱ्या राष्ट्राच्या अध्यक्षासाठी एखाद्या देशात अशी रॅली सहसा आयोजित करणे परराष्ट्र धोरणाला अनुसरुन होत नसते. ट्रम्प यांच्यासोबतच्या मोदींच्या दोस्तीचे दुष्परिणाम भविष्यात भारताला भोगावे लागणार आहेत, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

इंग्लडमध्ये  नवा कोरोनाचा प्रकार पसरू लागला असतानासुद्धा इंग्लडच्याच पंतप्रधानांना प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते. आता तर तो दौराही रद्द करण्यात आल्यामुळे भारतावर नामुष्कीची वेळ आली आहे.

याशिवाय भारताभोवतालच्या नेपाळ, श्रीलंका व भूतान या देशामधील राजकीय घटना व चीनचा या देशांवरील वाढत चाललेला प्रभाव या साऱ्यामुळे मोदींच्या परराष्ट्र धोरणातील अपरिपक्वता उघड झाली आहे, असेही गाडगीळ म्हणाले.

अमेरिकी लोकशाहीवर बुधवारी अध्यक्ष समर्थकांनीच हल्ला केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळे आणण्याच्या उद्देशाने मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ‘कॅपिटॉल’ या संसदेच्या इमारतीमध्ये धुडगूस घातला.

या वेळी हिंसाचारात चार जण ठार झाले. अमेरिकी संसदेने बायडेन-कमला हॅरिस यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर अखेर ट्रम्प यांनी पराभव मान्य केला. यामुळे नव्या अध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा : भाजपला मोठा धक्का,भाजपच्या माजी आमदारासह दोन नेत्यांनी शिवबंधन बांधले

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन विजयी (३०६ मते) होऊनही ट्रम्प पराभव मान्य करण्यास तयार नव्हते. आपल्याविरोधात कट रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी सुरूच ठेवला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी, तसेच अनेक न्यायालयांनीही तो फेटाळला होता.

पराभव मान्य करण्यास तयार नसलेल्या ट्रम्प यांचे समर्थक गुरुवारी संसदेवर धडकले. संसदेत नवनिर्वाचित सदस्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच शेकडो ट्रम्प समर्थक सुरक्षाव्यवस्थेचा भंग करून संसद इमारतीत घुसले.

ट्रम्प समर्थकांनी जवळपास चार तास हैदोस घातला. या वेळी हिंसाचारात एका महिलेसह चार जण ठार झाले. महिला गोळीबारात ठार झाली, तर इतर तिघे नैसर्गिक कारणांनी मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा : Elon Musk l अँमेझॉन प्रमुखांना मागे टाकत एलन मस्क बनले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्यासह लोकप्रतिनिधींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या हल्ल्याप्रकरणी अनेक आंदोलकांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रम्प समर्थकांचा हल्ला लज्जास्पद आहे, असे महानगर पोलीस विभागप्रमुख रॉबर्ट कोंटी म्हणाले.

जगभरात उमटले पडसाद

या घटनेचे अमेरिकेत आणि जगभर तीव्र पडसाद उमटले. देशाच्या लोकशाहीवरील हा हल्ला लज्जास्पद आहे. बायडेन यांच्या विजयाच्या वैधतेवर शिक्कामोर्तब करण्याची आमची जबाबदारी पार पाडण्यात असे हल्ले अडथळे आणू शकत नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी व्यक्त केली.

नवनिर्वाचित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनीही या हल्ल्याचा निषेध करत लोकशाही मूल्ये पाळण्याचा सल्ला ट्रम्प यांना दिला. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज बुश, बिल क्लिंटन, जिम्मी कार्टर यांनीही हल्याचा निषेध केला.

जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या विजयाच्या प्रमाणीकरणानंतर ट्रम्प यांनी नमते घेतले. या निवडणुकीचे निकाल अमान्य असले तरी २० जानेवारीला सत्तेचे हस्तांतरण सुरळीतपणे केले जाईल, असे ट्रम्प यांनी निवेदनाद्वारे जाहीर केले.

मात्र, ट्रम्प यांच्याविरोधात तीव्र पडसाद उमटत असून, हल्ल्यास त्यांनीच चिथावणी दिल्याचा आरोप होत आहे.

यह भी पढ़ें : एक्ट्रेस शिल्पा शिरोड़कर को दुबई में लगा कोरोना का टीका, बॉलीवुड की पहली सेलेब्रिटी हुईं वैक्सिनेटेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here