Disha Salian death : दिशा सालियानच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलवरुन इंटरनेट कॉलिंग!

Internet calling made by Disha Salian phone after her death
Internet calling made by Disha Salian phone after her death

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत सध्या तपास सुरु आहे. सुशांतपूर्वी तिची माजी मॅनेजर दिशा सालियानने 8 जून रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केली. दोघांच्या आत्महत्येबाबत काही लिंक आहे का? हा तपास सुरु असताना दिशा बद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. Internet calling made by Disha Salian phone after her death).

दिशा सालियानच्या मृत्यूनंतरही तिच्या मोबाईलवरुन इंटरनेट कॉलिंग झाल्याचं समोर आलं आहे. मात्र हे कॉल नेमकं कोणी केले? याचा अजून तपास लागलेला नाही. परंतु दिशाच्या आत्महत्येनंतर तिचा मोबाईल तपासला गेला नव्हता का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिशाच्या आत्महत्येनंतरही तिचा मोबाईल सुरुच होता

दिशा सालियानच्या आत्महत्येनंतरही तिचा मोबाईल सुरुच होता. 17 जूनपर्यंत मोबाईल सुरु राहिला असून त्यावरुन इंटरनेट कॉलिंग केल्याचंही समोर आलं आहे. आता हा मोबाईल नक्की कोणाकडे होता? हे अजून समोर आलेलं नाही. मोबाईलबद्दल मुंबई पोलिसांच्या लक्षात कसं आलं नाही? हा मुद्दा आता समोर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here