
मुंबई: उर्फी जावेद (Urfi Javed) आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे कायमच चर्चेत राहते. अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेदने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवरुन नेटकरी चांगलेच खवळले आहेत. सामान्यपणे उर्फीच्या तिच्या कपड्यांवरुन ट्रोल केलं जातं. मात्र दिवाळीनिमित्त उर्फीने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवरुन चाहत्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. कारण या व्हिडीओमध्ये उर्फी टॉपलेस असल्याचं दिसत आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देताना उर्फीने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवरुन लोकांनी हा काय बावळटपणा आहे अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडियावरील पोस्ट आणि वेगवेगळ्या कपड्यांमुळे टीव्ही अभिनेत्री उर्फी अनेकदा चर्चेत असते. इतर अनेक सेलिब्रिटींप्रमाणे उर्फीनेही नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांसाठी ‘हॅपी दिवाळी’ म्हणत दिवाळीच्या शुभेच्छा देणारा व्हिडीओ पोस्ट केला. मात्र हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना आनंद होण्याऐवजी त्यांचा संतापच अधिक झाल्याचं कमेंट सेक्शनमध्ये दिसत आहे.
उर्फीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती सोफ्यावर बसलेली दिसत आहे. एका हाताने तिने स्तन झाकले आहेत. दुसऱ्या हाताने एखाद्या मोठ्या आकाराच्या लाडूप्रमाणे दिसणारा गोड पदार्थ खात उर्फी कॅमेराकडे पाहून पोज देते. या व्हिडीओमध्ये पणत्यांनी सजवलेलं ताटही बाजूच्या टेबलवर ठेवलेलं दिसत आहे.
उर्फीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांची तळपायाची आग मस्तकात गेल्याचं कमेंट सेक्शनमध्ये दिसत आहेत. तर काहींनी उर्फीला यावरुन ट्रोलही केलं आहे. ‘मला वाटलं ही फटाक्यांनी दिवाळी स्पेशल ड्रेस बनवेल’, असं एका युझरने उर्फीला ट्रोल करताना म्हटलं आहे. तर अन्य एकाने, ‘हा काय बोगसपणा आहे’, अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
अन्य एकाने, ‘आपल्या घरच्यांसमोरही तू अशीच फिरते का?’ अशा शब्दांमध्ये आपला संताप व्यक्त केला आहे. एका अन्य युझरने, ‘तुम्ही फार चुकीचं वागत आहात’, असं म्हणत राग व्यक्त केला आहे.
एका युझरने तर गोड पदार्थ खाण्याचा आणि अशाप्रकारे टॉपलेस होण्याचा काय संबंध आहे असं विचारलं आहे. “हे तर तू साध्या पद्धतीने पण खाऊ शकतेस. त्यासाठी नागडं होऊन बसण्याची काय गरज आहे?” असं विचारलं आहे.
View this post on Instagram
उर्फी अशाप्रकारे पहिल्यांदाच चर्चेत आलेली नाही. यापूर्वीही तीने अनेकदा विचित्र कपडे घालून पोस्ट केलेल्या फोटोंवरुन वाद झाला आहे. अनेकदा तिला तिच्या कपड्यांसाठीही ट्रोल केलं जातं. उर्फीने सध्या पोस्ट केलेला आणि ज्यावरुन वाद निर्माण झाला आहे.