IPL 2020 : स्टेडियममध्ये मीडियाला प्रवेशबंदी

Ipl 2020-not allowed-for-media-at-the-stadium-uae-bcci
ipl सामन्यांमध्ये मीडिला प्रवेशबंदी Ipl 2020-not allowed-for-media-at-the-stadium-uae-bcci

मुंबई : आयपीएलच्या 13व्या सीजनमध्ये बीसीसीआयने स्टेडियममध्ये मीडियाला परवानगी नाकारली आहे. आयपीएलच्या 13 व्या सीजनचा पहिला सामना आज ( शनिवार 19 सप्टेंबर )संध्याकाळी 7:30 वाजता मुंबई इंडियंस आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान होत आहे.

 बीसीसीआयने सांगितले की, कोविड-19 महामारीच्या पार्श्वभुमीवर आरोग्य सुरक्षा प्रोटोकॉलमुळे मीडियाला स्टेडियमच्या आत जाण्याची परवानगी नाकारली आहे. शुक्रवारी रात्री बीसीसीआयने गाइडलाइन जारी केली. आयपीएलच्या 13 व्या सीजनचा पहिला सामना आज शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता होत आहे.

बीसीसीआयने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले की, ‘ड्रीम-11 इंडियन प्रीमियर लीग 2020 कोविड-19 महामारीमुळे यूएईत बंद स्टेडियममध्ये आयोजित केली जात आहे. आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉलमुळे मीडियाला सामना किंवा संघाचा अभ्यास सत्र कव्हर करण्यासाठी स्टेडियमच्या आत जाण्याची परवानगी नसेल.

 या सीजनमध्ये फ्रेंचाइजीला सामन्यापूर्वी पत्रकार परिषद करण्याची गरज नसेल. परंतू, सामना झाल्यानंर व्हर्च्युअल पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here